बी माय व्हॅलेन्टाइन..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 05:36 PM2018-02-14T17:36:05+5:302018-02-14T18:00:40+5:30
बघा, अंगावर तेच रोमांच पुन्हा उभे राहतात की नाही?..
- मयूर पठाडे
प्रेमाला, प्रेमाच्या दिवसाला आता तारखेचं कोंदण मिळालेलं असलं, १४ फेब्रुवारी या प्रेमाच्या दिवसांत तुमचं प्रेम बंदिस्त झालेलं असलं, तरी प्रेम असं एका दिवसांत थोडी मोजता येतं, करता येतं आणि व्यक्त करता येतं?..
आपल्या प्रेमाचा व्हॅलेन्टाइन्स डे तर तसा रोजचाच असतो..
तरीही आजच्या या दिवसाविषयी खास..
आपला रोजचाच दिवस व्हॅलेन्टाइन्स डे कसा करायचा?..
मोठमोठ्या गोष्टींत, लंब्याचवड्या भाषणबाजीत, चॉँद-तारे तोडून तिच्या केसात माळण्याच्या रोमॅँटिक कल्पनांत, महागड्या गिफ्ट्समध्ये हे प्रेम नसतंच.. कल्पना कितीही रोमॅँटिक असल्या तरी वास्तवाचं भान आणि त्याला वास्तवातच दिलेली कृतीची जोडच महत्त्वाची..
नुसत्या सहवासाची ती गोड गुलाबी आठवणही मग तुमच्या त्या क्षणाला व्हॅलेन्टाइन्स डेचं माधुर्य आणू शकते..
आठवा पहिल्यांदा तुमची कधी नजरानजर झाली होती, पहिल्यांदा तुम्ही कधी एकमेकांचा हात हातात घेतला होता, पहिल्यांदा कधी (चोरुन) एकत्र सिनेमा पाहिला होता.. आठवा तुमची पहिली भेट, पहिलं हॉटेल, पहिली ट्रिप.. पहिली लॉँग राईड.. आणि पहिल्यांदा एकमेकांमध्ये जाणवलेला पहिला स्पार्क..
करा शेअर ते परत एकदा एकमेकांमध्ये..
तुमचं प्रेम नवीन असो, अथवा मुरलेलं, ओठांवर येण्याचं आता थिजलेलं..
लंच किंवा डिनरला नेण्यापेक्षा, न्या आपल्या पार्टनरला ब्रंचला..
बघा, पुन्हा ती धडधड, ती हुरहुर तुम्हाला जाणवते की नाही?..
हातात हात घेऊन जा पुन्हा एकदा ‘त्याच’ रस्त्यावरुन फिरत..
बघा, ती याद येते की नाही?..
त्यावेळचे ढग आकाशात दाटून येतात की नाही?
भर उन्हात एकांतातल्या झाडाखाली उभं राहिल्यानंतरची गार वाºयाची ती झुळुक पुन्हा स्पर्शून जाते की नाही?..
अंगावर तेच रोमांच पुन्हा उभे राहतात की नाही?..
बी माय व्हॅलेन्टाईन..
हे मग शब्द राहत नाहीत, उरतो तो एक कायमस्वरुपी जिवंत अनुभव..