बेडरूमध्ये 'या' चुका करत असाल, तर नातं बिघडायला वेळ लागणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 12:25 PM2020-04-17T12:25:33+5:302020-04-17T12:34:18+5:30

एका खोलीत बंद असताना तुम्ही काही चुका करत असाल तर तुमच्या नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे.

Bedroom mistakes which can break your relationship myb | बेडरूमध्ये 'या' चुका करत असाल, तर नातं बिघडायला वेळ लागणार नाही

बेडरूमध्ये 'या' चुका करत असाल, तर नातं बिघडायला वेळ लागणार नाही

googlenewsNext

सध्या कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. सगळेजण आपापल्या घरी आहेत. काहीजण वर्क फ्रॉम होम तर काहींजणांचं काम पूर्णपणे बंद आहे. यापैकी भरपूर लोक पहिल्यांदाच इतका वेळ घरी घालवत असतील.  त्यामुळे कधीही न उद्भवलेल्या प्रसंगांना  तोंड द्यावं लागणार आहे. सतत घरात थांबून चिडचिड होते म्हणून काही लोक तो राग आपल्या पार्टनरवर काढत आहेत.

अशा वागण्यामुळे तुमचं नात बिघडू शकतं. तसंच  एका खोलीत बंद असताना तुम्ही काही चुका करत असाल तर तुमच्या नात्यात  दुरावा येण्याची शक्यता आहे. म्हणून बेडरुममध्ये असतना पार्टनरशी कसं वागायवा हवं  याबाबत आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.


मोबाईलचा अतिवापर

जास्तीत जास्त लोकांना दिवसरात्र हातात मोबाईल घ्यायची सवय असते. काही लोक जेवताना पण  मोबाईलचा वापर करतात. झोपताना सुद्धा सोशल मीडिया चेक करण्याची सवय असते. पण पार्टनरसोबत बेडरुममध्ये असताना तुम्ही अटेंशन न देता फोनचा वापर करत असाल तर इग्नोर केल्याचं तिला फिल होऊ शकतं. वादाला तोंड फुटण्याआधीच मोबाईलचा वापर थांबवा.

कमी बोलणं

बेडरुम आल्यानंतर तुम्ही सतत मोबाईल वापरत असाल तर पार्टनरला वाईट वाटू शकतं. त्यापेक्षा तुम्ही एकत्र असाल तेव्हा पार्टनरशी गप्पा मारा. पत्नी बेडरूममध्ये यायच्या आधी जर तुम्ही झोपत असाल आणि हे सतत होत असेल तर तुमच्यातील कम्युनिकेशन गॅप वाढत जाऊ शकतो. याचे वाईट परिणाम तुमच्या नात्यावर होऊ शकतात.  नातं चांगलं ठेवण्यासाठी आपल्या पार्टनरला वेळ द्या.

स्वत-चा  सामान कसाही पडलेला राहू देणं

ही खूप छोटीशी गोष्ट आहे. पण तुमच्या लक्षात येणं तितकंच गरजेचं आहे. घराची किंवा बेडरुमची साफसफाई करण्याचं काम तुमच्या पत्नीचं आहे, असं जराही समजू नका. जर कपडे किंवा कोणतंही तुमचं सामान असंच पडलेलं ठेवत असाल तर पार्टनरला राग येण्याची शक्यता असते. जरी तुमच्या पत्नीने काहीही रिएक्ट केलं नाही. पण तिला राग आला असेल आणि दुर्लक्ष केलं असेल तर नंतर तुम्हाला या गोष्टी महागात पडू शकतात. एकदाच सगळा राग बाहेर येऊ शकतो. म्हणून पार्टनरला त्रास होईल असं वागू नका.

प्रकृतीकडे दुर्लक्ष करणं

जर तुमची पार्टनर थकली असेल तर सतत कोणत्याही वस्तू हातातल्या  हातात मागू नका. तिच्या प्रकृतीकडे लक्ष देत नसाल तर तुम्ही याचा अर्थ असा होतो की तुम्हाला पार्टनरची जराही काळजी नाही. जबाबदारी सांभाळत असताना तुम्ही सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न करा.

इच्छा नसताना रोमांस

रोमांस करण्य़ासाठी कोणताही दिवस निश्चित नसेल तरी तुमच्या मुडवर डिपेंड करत असतं. जर तुमची पार्टनर थकली असेल, तिचा मुड नसेल तर तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स करू नका. त्यांच्या फिंलिग्सचा आदर करा.  पती असल्यामुळे तुम्ही इच्छा नसतानाही पत्नीला प्रेशर करू शकता असं वाटत असेल तर हा विचार आजचं बदला.  

Web Title: Bedroom mistakes which can break your relationship myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.