'असा' पार्टनर असेल तर आयुष्य वाढतं आणि मेंदूची क्षमताही, रिसर्चमधून खुलासा...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 11:39 AM2020-02-26T11:39:06+5:302020-02-26T11:39:16+5:30
पार्टनर कशाप्रकारचा आहे यावर तुमच्या लाइफवरही प्रभाव पडत असतो. त्यामुळे पार्टनर कसा वागतो हेही माहीत असणं फार महत्वाचं आहे.
(Image Credit : freepressjournal.in)
नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार एका आशावादी व्यक्तीसोबत रोमॅंटिक रिलेशनशिप असले तर तुमच्या आयुष्याची आणि मेंदूची क्षमता वाढू शकते. कारण आशावादी लोकांचं वागणं हे नेहमी हेल्दी असतं. तसेच एका आशावादी व्यक्ती आपल्या पती किंवा पत्नीसाठी एक चांगलं आणि हेल्दी व्यवहार फॉलो करण्यासाठी एक उत्तम उदाहरण ठरू शकते. कारण आशावाद हा एक गुण आहे जो शिकला जाऊ शकतो.
(Image Credit : Social Media)
मिशिगन युनिव्हर्सिटीतील अभ्यासकांच्या एका ग्रुपनुसार, जेव्हा तुम्ही मोठे होता तेव्हा तुमचा मेंदू अधिक वेगवान असल्याचं रहस्य यात लपलेलं असतं की, तुमचा जोडीदार किती आशावादी आहे. तुमची समजण्याची क्षमता कोणत्या कारणांमुळे कमी होते किंवा वाढते हे खालील काही गोष्टींवरून बघता येईल.
(Image Credit : pinterest.ca)
१) मिशिगन युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक आणि रिसर्चचे मुख्य लेखक विलियम जे चॉपिक यांनी सांगितले की, समजण्याची क्षमता कमी होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. यात आनुवांशिक समस्या, बायोलॉजिकल मार्कर आणि जीवनशैलीची कारणे असतात.
२) जीवनशैलीसंबंधी कारणांमध्ये शारीरिक हालचाली, पौष्टीक आहार, वजन आणि अधिक सक्रिय असणं यांचा समावेश आहे. एक रूटीन लाइफ जगणं याचाही यात समावेश करता येऊ शकतो.
(Image Credit : dashofwellness.com)
३) चॉपिक म्हणाले की, जे लोक आशावादी असतात ते आरोग्यदायी व्यवहार जसे की, चांगला आहार, अधिक सक्रिया राहणे आणि प्रिव्हेंटिव हेल्थकेअरशी संबंधित असतात.
(Image Credit : idealshape.com)
४) कदाचित हेच कारण आहे की, आशावादी असणं ही समजण्याची क्षमता वाढण्यासाठी सर्वात चांगली बाब आहे. तसेच या रिसर्चमध्ये हेही सांगण्यात आलं आहे की, आशावादी व्यक्तीसोबत रोमॅंटिक रिलेशनशिपमध्ये असल्याने पार्टनरला वेगवेगळे फायदे होतात.