कमी उंचीच्या पुरूषांसोबत लग्न करण्याचे होतात 'हे' फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 05:17 PM2019-03-26T17:17:45+5:302019-03-26T17:18:43+5:30

प्रत्येकाच्याच आपल्या पार्टनरकडून अनेक अपेक्षा असतात. काही लोकं त्याच्या स्वभावाचा विचार करतात तर काही लोक दिसण्याचा. डेटिंग किंवा लग्नाची गोष्ट असते त्यावेळी मुलींना बऱ्याचदा आपल्यापेक्षा उंचीने जास्त असलेला लाइफ पार्टनर हवा असतो.

Benefits of marrying or dating a short guy | कमी उंचीच्या पुरूषांसोबत लग्न करण्याचे होतात 'हे' फायदे!

कमी उंचीच्या पुरूषांसोबत लग्न करण्याचे होतात 'हे' फायदे!

Next

प्रत्येकाच्याच आपल्या पार्टनरकडून अनेक अपेक्षा असतात. काही लोकं त्याच्या स्वभावाचा विचार करतात तर काही लोक दिसण्याचा. डेटिंग किंवा लग्नाची गोष्ट असते त्यावेळी मुलींना बऱ्याचदा आपल्यापेक्षा उंचीने जास्त असलेला लाइफ पार्टनर हवा असतो. असं का यामागे असं काही कारण नसतं, शेवटी प्रत्येकाची चॉईस. कदाचित त्यांना आपल्यापेक्षा उंचीने लहान असणारा पार्टनर असण्याचे फायदे माहित नसावेत. काय सांगता तुम्हालाही माहीत नाहीत का? आम्ही सांगतो.  तुमच्यापेक्षा उंचीने कमी असणाऱ्या मुलांना डेट करण्याचे फायदे...

कॉन्फिडंस

जर एखादा मुलगा आपल्यापेक्षा उंचीने जास्त असणाऱ्या मुलीला डेट करण्याचा किंवा तिच्यासोबतच लग्न करण्याचा विचार करत असेल. फक्त एवढचं नाही तर तो तिच्यासोबत सर्वांसमोर हँगआउट करत असेल तर हा तो कॉन्फिडंट आणि ओपन माइंडेड असण्याचा पुरावा आहे. कोणत्याही नात्यामध्ये पार्टनर तुमच्याबाबतीत कॉन्फिडंट आणि ओपन माइंडेड असेल आणि तो तुम्हाला तुमची स्पेस देत असेल तर ही गोष्ट नातं टिकण्यासाठी उत्तम ठरते. 

चीटिंग 

एका संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार रिलेशनशिपमध्ये छोट्या उंचीची मुलं आपल्या पार्टनरशी लॉयल असतात. तसेच ते आपल्या पार्टनरला जास्त जपतात. पण जास्त उंचीची मुलं आपल्या पार्टनरला फसवण्याची शक्यता जास्त असते. 

लव मेकिंग 

कमी उंचीची मुलं आपल्या पार्टनबाबत फार केअरिंग असतात. तसेच आपल्या पार्टनरला खूश ठेवण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. ते सतत पार्टनरबाबत विचार करत असतात. 

कमिटमेंट 

न्यू यॉर्क यूनिवर्सिटीने केलेल्या सर्वेनुसार, जास्त उंची असलेली मुलं रिलेशनमध्ये आल्यानंतर लगेच लग्नाचा विचार करतात. पण त्यानंतर मात्र त्यांच्यामध्ये आणि पार्टनरमध्ये सतत खटके उडत राहतात. पण याउलट कमी उंचीची मुलं पार्टनसोबत लग्नबंधनात अडकण्याच्या आधी स्वतःच्या आणि पार्टनच्या कम्फर्टचा विचार करतात. 

हिल्सपासून सुटका

उंच मुलांच्या समोर जास्त लहान दिसू नये म्हणून मुली हिल्स घालतात. अनेकदा सतत हिल्स वेअर केल्याने मुलींना पायांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. पण तेच जर तुमच्या पार्टनरची उंची कमी असेल तर तुमची हिल्सपासून सुटका होण्यासाठी मदत होते. 

टिप : वरील गोष्टी आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. 

Web Title: Benefits of marrying or dating a short guy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.