​बेस्ट फ्रेंडस् फॉरेव्हर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2016 12:01 PM2016-03-10T12:01:44+5:302016-03-10T05:01:44+5:30

गेली चार वर्षे तो  पेंग्विन याओला भेटण्यासाठी न चुकता येतो.

Best Friends Forever | ​बेस्ट फ्रेंडस् फॉरेव्हर

​बेस्ट फ्रेंडस् फॉरेव्हर

Next
राण्यांपेक्षा आपला मेंदू जरी मोठा असला तरी कृतज्ञता, उपकाराची जाण आणि मान ठेवण्याची वृत्ती मानवांपेक्षा नक्कीच जास्त असते.

आता ज्या पेंग्विनबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यावरून तुमचा यावर विश्वास आणखी दृढ होईल.

याओ परेएरा डीसूझा हा ब्राझीलमधील एक सामान्य कोळी. २०११ साली त्याला एके दिवशी किनाऱ्यावर जखमी पेंग्विन आढळला. तेलाने संपूर्ण माखलेल्या पेंग्विनला तसेच मृत्यूच्या दारात सोडून देण्याऐवजी त्याने त्यालासोबत नेले आणि मनोभावे त्याची काळजी घेतली.

याओने त्याचे नाव ‘डिनडिम’ ठेवले. जेव्हा डिनडिम पूर्णपणे बरा झाला तेव्हा त्याची याओशी छान गट्टी जमली. परत जाण्याऐवजी तो अकरा महिने याओसोबत राहिला.

a man and a penguin

याओ म्हणतो, ‘सुरूवातील तो जाण्यास तयार नव्हता. परंतु एकेदिवशी तो निघून गेला. तो सोडून गेला याचे मला खूप दु:ख झाले. पण विश्वास वाटत होता की तो, कधी तरी परत येईल. माझे मित्र म्हणायचे अरे तो प्राणी आहे, तो नाही येणार परत.’

पण डिनडिम याओला विसरला नव्हता. काळी महिन्यांनी तो परत आला. गेली चार वर्षे तो याओला भेटण्यासाठी न चुकता येतो. याओ सांगतो, ‘त्याला पुन्हा पाहून मला विश्वासच बसला नाही. दरवर्षी तो जून महिन्यात येतो आणि फेब्रुवारी महिन्यात परत जातो. प्रत्येक भेटीमध्ये तो अधिकच प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण होतोय. मला पाहून तो खूशदेखील दिसतो. डिनडिम माझ्या मुलासारखा, नव्हे...तो तर माझा मुलगाच आहे.’ अशी मैत्रीपाहून चांगुलपणावर विश्वास वाढेल.

Web Title: Best Friends Forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.