लग्नाआधी १-२ ब्रेकअप होणं फायद्याचे! डॉ. विकास दिव्यकीर्ती सर असे का म्हणाले? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 02:18 PM2023-10-18T14:18:16+5:302023-10-18T14:22:07+5:30
लग्न हे जन्मभरासाठी असतं, पण त्याआधी ब्रेकअप होणंही फायदेशीर...
Break ups before marriage : मन का हो तो अच्छा, ना हो तो और भी अच्छा... बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलेल्या या ओळी. या ओळींना खूप गहन अर्थ आहे. जेव्हा आपल्या मनाप्रमाणे घडतं तेव्हा लोक खुश असतात. पण ज्यावेळी आपल्या मनाच्या विरोधात घडतं तेव्हा ते नशीबात असतं आणि नशिब आपल्यासाठी जास्त चांगलं काहीतरी प्लॅनिंग करत असतं, असा या काव्यपंक्तीमागचा अर्थ आहे. प्रेमात पडलेल्या माणसाला हे समजून घेणं जरी खूप अवघड असलं, तरी प्रत्येकाने याचा विचार करायलाच हवा. आयुष्यात ब्रेकअप झाला म्हणजे सगळं संपलं असं मानणाऱ्यांनी कधीही हार मानू नये. उलट लग्नाआधी १-२ ब्रेकअप होणं ही चांगलीच बाब असते, त्याचा व्यक्तीला आयुष्यात फायदाच होतो, असे मत UPSC कोचिंग गुरू डॉ. विकास दिव्यकिर्ती यांनी म्हटले आहे. ते असं का म्हणाले, जाणून घेऊया...
मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते
डॉ. दिव्यकिर्ती यांच्या मते, ब्रेकअप व्यक्तीला मजबूत बनवते. ब्रेकअप ही परिपक्वतेची (मॅच्युरिटी) पायरी आहे. बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडसोबतचे नाते तुटल्याने सुरूवातीचा टप्पा त्रासदायक असतो पण नंतर मात्र व्यक्ती भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत बनते.
ब्रेकअप म्हणजे धडा
लग्नासाठी ब्रेकअप हा एक धडा म्हणून घ्यावा. लग्न हे नेहमी मॅच्युअर (प्रौढ) व्यक्तींमध्येच व्हायला हवे. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही एखाद्याशी आयुष्यभराचे बंधन बांधण्याआधीच ब्रेकअपच्या वेदनातून जाता, तेव्हा काही तडजोडींची सवय असल्याने लग्न दीर्घकाळ टिकण्यासाठी तुमच्याकडे समज असते.
व्यक्तीत बदल होतात
जेंव्हा एखाद्या व्यक्तीला हवं ते मिळत नाही, म्हणजेच त्याला जी व्यक्ती आवडते ती मिळत नाही, तेव्हा त्याच्यासाठी सगळं संपल्यासारखं वाटतं. बरेच दिवस त्या व्यक्तीला अन्नपाणीही गोड लागत नाही. कधीकधी अशा व्यक्तींना छोट्या छोट्या गोष्टींनी तीव्र वेदना होतात. पण त्यानंतर मात्र ती व्यक्ती कायमची बदलून जाते.