प्रेमाचा असाही रंग, प्रेमात पडल्यावर वजन होतं कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 03:50 PM2018-07-20T15:50:50+5:302018-07-20T15:51:14+5:30

दुसरीकडे असेही मानले जाते की, प्रेमात पडल्यावर लोकांचं वजन अधिक वाढतं, कारण ते बाहेर अधिक खातात. त्यातील फॅटमुळे वजन वाढतं.

Can falling in love help you lose weigh? | प्रेमाचा असाही रंग, प्रेमात पडल्यावर वजन होतं कमी

प्रेमाचा असाही रंग, प्रेमात पडल्यावर वजन होतं कमी

Next

(Image Credit: The Telegraph)

प्रेमात पडलेल्या व्यक्तीला तो वेगळ्याच दुनियेत असल्याचा अनुभव येत असतो. तर दुसरीकडे असेही मानले जाते की, प्रेमात पडल्यावर लोकांचं वजन अधिक वाढतं, कारण ते बाहेर अधिक खातात. त्यातील फॅटमुळे वजन वाढतं. पण आता असे म्हटले जात आहे की, प्रेमात पडल्यावर वाढत नाही तर कमी होतं. चला जाणून घेऊ काय आहे प्रकरण....

शोध काय म्हणतो?

डेली मेलमध्ये दिलेल्या एका रिपोर्टनुसार, याचा खुलासा झाला आहे की, प्रेमात पडल्यावर वजन कमी होतं. याचा अभ्यास करण्यासाठी २५ जोडप्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यांच्या हालचालींवर आणि वजनावर नियमीत लक्ष ठेवण्यात आलं. दोन महिन्यांनी या शोधात सामिल लोकांचं वजन कमी झाल्याचं आढळलं. 

प्रेरणा मिळते

हा सगळा खेळ डोक्यात सुरु असलेल्या गोष्टींचा आहे. जर तुम्ही आनंदी आहात तर तुम्हाला बाकी गोष्टींची काही पडलेली नसते. प्रेमात पडल्यावर डोपामाइनचा स्त्राव अधिक होतो. याने प्रेमात पडलेले लोक अधिक आनंदी असतात. त्यामुळे अशात तुम्ही जेही काम करता ते चांगलं होतं. प्रेमात पडल्यावर काही लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि ते सहज वजन कमी करू शकतात.

वेगाने बर्न होतात फॅट

शरीरात जेव्हा अतिरीक्त चरबी जमा होते तेव्हा वजन वाढतं. पण जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुमच्यासोबत अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरीक्त चरबी वेगाने बर्न होते. याला नोरपायनेफ्रिन म्हणतात. हे फॅट बर्न करून त्याला एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करतात. 

हार्मोन्सचा फंडा

प्रेमात पडल्यानंतर सगळंकाही चांगलं वाटत असलं तरी सगळं चांगलं घडत नसतं. काही गोष्टींमुळे तुम्ही अडचणीतही येता. दरम्यान तुम्हाला अनेकदा असा प्रश्न पडतो की, तुम्ही जे करत आहात ते योग्य आहे का? या द्विधा मनस्थितीला फेनीथिलामाइन म्हटले जाते. यालाच लव्ह हार्मोन्सही म्हणतात. यामुळेच भूक कमी लागते आणि दुसऱ्या हार्मोन्समुळे फॅटही वेगाने बर्न होतात. अशात तुम्ही स्वत:लाही अॅक्टीव्ह ठेवता. यानेच तुम्ही वजन कमी करू शकता. 

Web Title: Can falling in love help you lose weigh?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.