Corona virus : कोरोनापासून बचावासाठी कपल्सने 'अशी' घ्या काळजी...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 01:08 PM2020-03-09T13:08:49+5:302020-03-09T13:19:24+5:30
आज आम्ही तुम्हाला कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी कपल्सने कशी घ्यायला हवी ते सांगणार आहोत.
दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. भारतात सुद्धा अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. अशात लोकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण तयार झालं आहे. प्रत्येकजण खबरदारीचे उपाय म्हणून मास्क वापरण्यापासून, सॅनिटायजरचा वापर करण्यापर्यंत काळजी घेताना दिसून येत आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्याबरोबर तुमच्या पार्टनरच्या आरोग्याची काळजी घेणं पण तितकंच गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी कपल्सने कशी घ्यायला हवी ते सांगणार आहोत.
कोरोना सेक्शुअली पसरत नाही.
कोरोना व्हायरस हा सेक्शुअली उद्भवत असलेल्या आजारांपैकी नाही. अनेकांना अशी भिती आहे की हा मृत्यूचं कारण ठरणारा व्हायरस सेक्सच्या माध्यातून सुद्धा पसरू शकतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाईजेशनने हे स्पष्ट केले आहे की हा सेक्शुअली पसरणारा आजार नाही. त्यामुळे शरीरसंबंधातून कोरोना व्हायरस पसरेल अशी भिती तुमच्या मनात ठेवू नका.
किसिंगमुळे कोरोना इन्फेक्शन होत नाही
मागिल काही दिवसांपासून कोरोना व्हायरस किस केल्यामुळे पसरतो अशी अफवा पसरवली गेली होती. याच कारणामुळे इटली आणि इंग्लडमध्ये किस न करण्याचा सल्ला दिला जात होता. पण जर तुमच्या पार्टनरला सर्दी, ताप किंवा खोकला असेल तर नॉर्मल फ्लू आहे की कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन आहे याची डॉक्टरांना भेटून तपासणी करून घ्या.
सार्वजिक ठिकाणी जाऊ नका
कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी पार्टनरसोबत सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा. कारण जर एखादा इन्फेक्टेट व्यक्ती असेल तर तुम्हाला सुद्धा हे इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला निरोगी राहायचं असेल तर सार्वजनिक ठिकाणी सध्या जाऊ नका.
प्लॅन कॅन्सल करा
जर तुमच्या पार्टनरला सर्दी, ताप किंवा खोकला असे आजार उद्भवत असतील तर तुम्ही कुठेही बाहेर जाण्याचा प्लॅन केला असेल तरी तो कॅन्सल करा. आधी तुमच्या पार्टनरला दवाखान्यात घेऊन जा आणि तपासणी करा. ( हे पण वाचा-खूप कंफ्युज असतात 'या' राशीचे लोक, यांच्यावर प्रेम करणं ठरू शकते डोकेदुखी)
शक्यतो उष्ट अन्न खाऊ नका
नेहमी जरी तुम्ही पार्टनरसोबत शेअर करून किंवा भरवून उष्टं अन्न खात असाल तरी सध्या कोरोना व्हायरसची भिती असल्यामुळे एकमेकांचं उष्टं खाऊ नका. काही दिवस उष्टं पाणी आणि अन्न खाण्यापासून स्वतःला लांब ठेवा. (हे पण वाचा-'या' ४ गोष्टींवरून समजून जा की तुमची पार्टनर खूप जेलस फिल करतेय... )