क्रिकेटपटूंची जेलवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:15 AM2016-01-16T01:15:50+5:302016-02-06T11:48:32+5:30

 महिलेशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी बंगळुरु पोलिसांनी क्रिकेटपटू अमित मिश्रा यास अटक केली. त्यास नंतर जामिनावर सोडण्यात आले. परंतु अशाप्रकारे जेलची हवा खाणारा अमित काही पहिला खेळाडू नाही. याआधीही अशी जेलवारी जगभारातील अनेक खेळाडूंना घडली आहे. त्यावर एक नजर..  

Cricket | क्रिकेटपटूंची जेलवारी

क्रिकेटपटूंची जेलवारी

Next
n style="font-weight: 700;"> महिलेशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी बंगळुरु पोलिसांनी क्रिकेटपटू अमित मिश्रा यास अटक केली. त्यास नंतर जामिनावर सोडण्यात आले. परंतु अशाप्रकारे जेलची हवा खाणारा अमित काही पहिला खेळाडू नाही. याआधीही अशी जेलवारी जगभारातील अनेक खेळाडूंना घडली आहे. त्यावर एक नजर..



जेम्स फॉकर : ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू आणि विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील हिरो जेम्स फॉकर याला इंग्लंडच्या पोलिसांनी अपघातप्रकरणी अटक केली. एक रात्र त्याला कैदेत काढावी लागली. केलेल्या अपघाताबद्दल त्याला माफी मागावी लागली. त्याला यासाठी १0,000 ब्रिटिश पौंड दंड ठोठावण्यात आला. २४ महिन्यांसाठी त्याचे ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द करण्यात आले होते.



इंझमाम-उल-हक : १९९७ साली सहारा चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान टोरँटो पोलिसांनी इंझमाम-उल-हकविरुद्ध प्रेक्षकाच्या अंगावर बॅट घेऊन धावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मेगाफोनवरुन इंझमामच्या वजनावर त्या प्रेक्षकाने टिप्पणी केली होती. इंझमाम आणि तो प्रेक्षक यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले. दोघांनी एकमेकांविरुद्धचे आरोप मागे घेतले.


मणिंदर सिंग : २00७ साली कोकेन बाळगल्याप्रकरणी मंदगती गोलंदाज मणिंदरसिंग याला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.


परवेज रसूल : बॅगेत स्फोटकजन्य पदार्थ बाळगल्याबद्दल २00९ साली २0 वर्षीय गोलंदाज रसूल याला बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पोलिसांनी अटक केली होती. हे आरोप सिद्ध झाले नाहीत. काही कालावधीनंतर भारतीय क्रिकेट संघात पदार्पण करणारा जम्मू-काश्मीरचा तो पहिला खेळाडू ठरला.


अँड्री फ्लेचर : २0१५ साली वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू अँड्री फ्लेचर यास डॉमिनिका विमानतळावर अटक करण्यात आली. त्याच्याजवळ ५0 राऊंडच्या बंदुकीच्या गोळ्या आढळल्या होत्या.

ल्यूक पोमेर्सबॅच : २00९ साली ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ल्यूक यास दारू पिवून गाडी चालविल्याबद्दल तसेच पोलिसांचा गाडी थांबविण्याचा आदेश मोडल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. पोलीस अधिकार्‍याशी गैरवर्तन आणि पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याच्यावर पाच महिने बंदीही आणण्यात आली होती.

मखाया एन्टिनी : १९९९ साली दक्षिण आफ्रिकेचा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू मखाया एन्टिनी याला बफेलो पार्क स्टेडियमवरील स्वच्छतागृहात महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

मोहम्मद आसिफ : २00८ साली दुबई विमानतळावर बंदी घालण्यात आलेला पदार्थ बाळगल्याप्रकरणी आसिफला अटक करण्यात आली. १९ दिवस त्याची चौकशी करण्यात आली.

रुबेल हुसेन : २0१५ साली बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रुबेल हुसेन याच्यावर अभिनेत्री नाझनीन अख्तर हिने बलात्काराचा आरोप केला होता. काही दिवसानंतर तिने हा आरोप मागे घेतला.

श्रीसंत, अजित चंडेला, अंकित चव्हाण : २0१३ साली या तिन्ही क्रिकेटपटूंना बेटिंग आणि स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आली होती.

अमित मिश्रा :  भारतीय मंदगती गोलंदाज अमित मिश्रा यास महिलेच्या विनयभंगाप्रकरणी बंगळुरु पोलिसांनी अटक केली. त्याचा हा गुन्हा जामिनपात्र असल्याने मिश्रा अगदी काही तासाच्या कालावधीनंतर बाहेर आला.

Web Title: Cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.