डेटिंग केल्याने वाढू शकतो 'या' गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 03:34 PM2019-09-10T15:34:53+5:302019-09-10T15:43:50+5:30

या रिसर्चसाठी १०व्या वर्गातील ५९४ विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. अभ्यासकांनी त्यांना ४ गटात विभागले.

Dating can lead depression know the reason | डेटिंग केल्याने वाढू शकतो 'या' गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या कारण...

डेटिंग केल्याने वाढू शकतो 'या' गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या कारण...

Next

(Image Credit : eharmony.co.uk)

एका रिसर्चमधून समोर आलं की, कमी वयातच डेटिंग केल्याने टीनएजर्स डिप्रेशनचे शिकार होऊ शकतात. या रिसर्चशी संबंधित लेखक बुरक डॉग्लस यांनी सांगितले की, वाढत्या डेटिंग अ‍ॅप्सच्या वापराने तरूणाई कमी वयातच डेटिंग करू लागतात आणि अशात ते लवकर डिप्रेशनने ग्रस्त होतात. डॉग्लस फिलिजिक एज्युकेशनचे शिक्षक आहेत. हा रिसर्च जॉर्जिया युनिव्हर्सिटीच्या हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

(Image Credit : life.spectator.co.uk)

या रिसर्चसाठी १०व्या वर्गातील ५९४ विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. अभ्यासकांनी त्यांना ४ गटात विभागले. शिक्षकांनी दिलेलं रेटींग आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रश्नावलीचा उपयोग करून तुलना केली गेली. या रिसर्चमध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की, जे लोक डेटिंग करत नाहीत, ते डिप्रेशनसारख्य गंभीर आजारापासून बचावतात. अशा लोकांमध्ये डेटिंग करणाऱ्या लोकांच्या तुलनेत अधिक कौशल्य क्षमता असते.

(Image Credit : carolinaparent.com)

डेटिंग अ‍ॅप्सच्या वाढत्या वापरामुळे आजकाल कमी वयात लहान मुलं डेटिंग करू लागले आहेत. त्यामुळे त्यांना डिप्रेशनचा धोका वाढत आहे. या रिसर्चमधून समोर आले की, जी लहान मुलं कधीही कोणत्याही रोमॅंटिक रिलेशनमध्ये राहिले नाहीत, त्यांच्यात डेटिंग करणाऱ्यांच्या तुलनेत सामाजिक कुशलता अधिक असते. 

(Image Credit : music.lovetoknow.com)

डिप्रेशनचे शिकार झालेले लोक सर्वातआधी समाजापासून दूर जाऊ लागतात. त्यांना समाजात राहणं अजिबात पसंत नसतं. डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तींना कोणतीही गोष्ट आवडत नाही. त्यांना आनंदाच्या क्षणीही दु:खं दिसू लागतं. ते कधीही सकारात्मक विचारांना जवळ येऊ देत नाहीत. अशा लोकांना वाटत असतं की, त्यांच्या जीवनात काहीच चांगलं नाहीये. त्यांची जगण्याची इच्छा संपलेली असते. 

Web Title: Dating can lead depression know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.