लग जा गले ! पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 06:44 PM2018-10-23T18:44:35+5:302018-10-23T19:32:39+5:30

प्रेम शब्दांच्या पलिकडले असेल आणि मन की बात व्यक्त करण्याची हिंमत होत नसेल, तेव्हा भावना व्यक्त करण्यासाठी 'जादू की झप्पी'चा आधार घ्या, म्हणजेच मिठीचा.

different types of hugs and its meaning | लग जा गले ! पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन 

लग जा गले ! पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन 

'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं', आपल्या भावना आवडत्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक जण मंगेश पाडगावकर यांच्या या कवितेचा आधार कधी ना कधी तरी घेतो. प्रेम शब्दांत व्यक्त करायचं म्हटलं की आपसूकच ही कविता प्रत्येकाच्या डोक्यात येतेच. पण भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच नेहमी महत्त्वाची भूमिका बजावतात का?, तर असा काही नियम नाही. हावभाव, वागणं, पाहणं, इशारे आणि विशेष म्हणजे स्पर्शद्वारेही अव्यक्त प्रेम आपल्या आवडत्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकते. 

प्रेम शब्दांच्या पलिकडले असेल आणि मन की बात व्यक्त करण्याची हिंमत होत नसेल, तेव्हा भावना व्यक्त करण्यासाठी 'जादू की झप्पी'चा आधार घ्या, म्हणजेच मिठीचा. मिठी मारणं हे प्रेम व्यक्त करण्याची एक निराळीच पद्धत आहे. मिठी मारण्याची एकच पद्धत असल्याचे अनेकांचं म्हणणं आहे. पण खरंतर तसं नाहीय. मिठी मारण्याच्या पद्धतींमध्येही प्रचंड फरक आहे. चला तर मग जाणून घेऊया Hug करण्याच्या पद्धती आणि मिठीच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचे रिलेशनशिप 

1. घट्ट मिठी मारणे :
जर तुमचा पार्टनर घट्ट मिठी मारत असेल तर त्याला तुमच्यापासून दूर जाण्याची अजिबात इच्छा नाहीय. नात्यात दुरावा येऊ नये, अशी त्याची कायम भावना असते. शिवाय, पार्टनर तुमच्यासोबत वेळ घालवण्यास आवडते. घट्ट मिठी म्हणजे रोमँटिक असणे असे नाही तर तुम्ही  एकमेकांच्या प्रचंड जवळ आहात, हे दिसून येते.

2. बिअर हग :
बिअर हग म्हणजे तुमच्यात आणि पार्टनरमध्ये मुंगी शिरण्यासाठीही जागा नसते, इतके तुम्ही एकमेकांच्या जवळ असता. यावरुन दोघांमध्ये किती प्रेम आहे, दोघांना एकमेकांची किती काळजी आहे, ही भावनादेखील दिसते.

3. खांद्यावर डोके ठेवून मिठी मारणं :
या मिठीला स्लीपि हग असंही म्हणतात. यामध्ये तुम्ही पार्टनरच्या खांद्यावर डोके ठेऊन त्याला/तिला हग करता. याचा अर्थ तुम्ही आपल्या पार्टनरसोबत खूप कम्फर्टेबल फील करता. त्याच्यासोबत राहिल्यास तुम्हाला कशाचीही काळजी वाटत नाही. तुमच्या मिठीत पार्टनरला अतिशय सुरक्षित वाटते. 

4. डेडलॉक हग :
तुमचा पार्टनर तुम्हाला पाहून खूप झाल्यावर अशा पद्धतीनं हग करतो. तुमच्यापासून दुरावण्याचीही त्याला भीती सतावत असावी. त्यामुळे यासंदर्भात बोलून नात्यात दुरावा निर्माण होणार नाही, याबाबत त्याला भरवसा द्यावा.

5. अर्धवट मिठी मारणे : 
जर तुमचा पार्टनर तुम्हाला पूर्ण मिठी न मारता अर्धवटच हग करत असेल तर तुम्हाला त्याच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. कदाचित त्याला/तिला आता तुमच्यात काहीही इंटरेस्ट नसण्याची शक्यता असू शकते.

6. पॅशनेट हग : 
जेव्हा एखादी व्यक्ती खूपच जवळ असते, तेव्हा ती पॅशनेट हग  करते. जर तुमचा पार्टनर तुम्हाला पॅशनेट हग करत असेल तो/ती प्रचंड रोमँटिक आहे आणि तुमच्यासोबत त्याचे/तिचे इमोशनल नाते आहे. 

7. दीर्घकाळ मिठीत असणे (लॉन्ग होल्ड हग):
पार्टनरनं मिठी मारल्यानंतर दीर्घकाळापर्यंत तुम्हाला पकडूनच ठेवले असेल तर त्याला तुमची फारच गरज आहे, हे समजून घ्या. पार्टनर कोणत्या गोष्टीमुळे तणावात आहे?, काळजीत आहे?, हे त्याला /तिला विचारा. त्याच्या/तिच्यासोबत बसून समस्या जाणून घेतल्यास त्यांना खूप हलकं वाटेल. शिवाय, प्रत्येक प्रोब्लेम्समध्ये तुम्ही त्यांच्यासोबत असता हे समजल्यानंतर त्यांना होणाऱ्या आनंदाची तुलना कशाचीही केली जाऊ शकत नाही. 

Web Title: different types of hugs and its meaning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.