मुलांचे निर्णय ते स्वत:च घेतात की तुम्ही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 05:24 PM2017-09-29T17:24:53+5:302017-09-29T17:26:52+5:30

मुलांचा कल ओळखून त्याला थोडी हवा द्या आणि मग पाहा..

Do children decide on their own or you take the decisions on behalf of them? | मुलांचे निर्णय ते स्वत:च घेतात की तुम्ही?

मुलांचे निर्णय ते स्वत:च घेतात की तुम्ही?

Next
ठळक मुद्देमुलांना त्यांचा निर्णय स्वत:च घेऊ द्या.त्यातल्या अडथळ्यांची जाणीव त्याला करुन दिली तर तो अधिक जबाबदारीनं आपला निर्णय घईल.त्यासाठीची संधी मात्र वेळोवेळी त्याला आवर्जुन उपलब्ध करून द्या.

- मयूर पठाडे

बºयाचदा आपण काय करतो? आपल्या मुलाला काय हवं, काय नको, त्याच्यासाठी काय चांगलं, काय वाईट, या सगळ्या गोष्टींचा निर्णय आपण स्वत:च घेतो. मुलांना काय कळतं, असंच आपल्याला वाटत असतं. त्यामुळे मूल कितीही मोठं झालं तरी त्याच्यावतीनं आपणच निर्णय घेत असतो. आपले निर्णय त्याच्यावर थोपत असतो.
आपल्याला जसं हवं, तसंच त्यानं बनलं पाहिजे, मुलानं डॉक्टर बनावं, इंजिनिअर बनावं असं आपल्या मनानं सुरुवातीलाच ठरवलेलं असतं, त्या चक्रात मग आपण त्याला ढकलतो आणि त्याच्याकडून त्यासाठी आवश्यक असणाºया गोष्टी जोरजबरदस्तीनं करवून घेतो.
पण कधी विचारलंय आपल्या मुलाला, अरे तुला खरंच काय करायचंय, कोणत्या गोष्टीत तुला इंटरेस्ट आहे?.. बºयाचदा मुलांचा इंटरेस्ट, त्यांचा कल कुठे आहे, हे आपल्याला दिसतही असतं, पण आपण अगोदरच झापडं लावलेली असल्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे दुहेरी नुकसान होतं. मुलाला जे हवं ते त्याला करता येत नाही, त्याच्या ज्या क्षमता उच्च दर्जाच्या असतात, ते सोडून दुसरंच काही करण्यासाठी आपण त्याला भाग पाडतो. असं करण्यानं ना त्याला फारसं पुढे जाता येत, ना आपल्या स्वप्नांची पूर्तता होत..
मुलांना त्यांचा निर्णय स्वत:च घेऊ द्या. त्यातल्या अडथळ्यांची भले त्याला जाणीव करून द्या.. या वाटेवर कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत, कोणती आव्हानं आहेत, हे त्याला कळलं तर तो अधिक जबाबदारीनं आपला निर्णय घईल, पण आपल्या आवडीची गोष्ट केल्यामुळे त्याच्यात जी ऊर्जा निर्माण होईल, आपण ‘पॉवरफुल’ असल्याचा जो एक आत्मविश्वास त्याच्यात निर्माण होईल, तो कोणत्याच गोष्टीनं येणार नाही.
त्यामुळे आपल्या जबाबदारीचं तर भान त्याला येईलच, शिवाय परिणामांची जबाबदारी घेणं हीदेखील आपलीच जबाबदारी आहे, हे त्याला कळेल.
त्यासाठीची संधी मात्र वेळोवेळी त्याला आवर्जुन उपलब्ध करून द्या.
मुलांमधला इंटरेस्ट ओळखून, त्यांचा कल पाहून त्याला थोडी हवा द्या आणि मग पाहा, मूल कुठे जातं ते..

Web Title: Do children decide on their own or you take the decisions on behalf of them?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.