तुमची गर्लफ्रेन्ड तुम्हाला इग्नोर करते का? ही असू शकतात कारणं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 01:23 PM2018-04-09T13:23:45+5:302018-04-09T13:23:45+5:30
असं होण्याला कोणतही एक कारण नसतं. हे घडण्याला एकापेक्षा जास्त कारणे असू शकतात. ही कारणे काय असू शकतात हे जाणून घेऊया...
मस्त मजेत सुरु असलेलं तुमचं रिलेशन एकाएकी अडचणीत येतं. कारण अचानकपणे तुमची गर्लपफ्रेन्ड तुम्हाला इग्नोर करु लागते. याचं नेमकं कारण कळू न शकल्याने तुम्हीही विचार करुन करुन हैराण झालेले असता. पण असं होण्याला कोणतही एक कारण नसतं. हे घडण्याला एकापेक्षा जास्त कारणे असू शकतात. ही कारणे काय असू शकतात हे जाणून घेऊया...
* प्रत्येकवेळी तर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेन्डजवळ असू शकत नाही. पण मुलींना असं वाटतं की, त्यांच्या नात्याला थोडी स्पेस मिळावी. तिला असं वाटतं की आपल्या पार्टनरसाठी सरप्राईस प्लान करावा. पण जर तुम्ही तिला एकटच सोडणार नाहीतर तर ती हे सगळं कसं करेल? अशात तिला तुमचा कंटाळा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती तुम्हासा इग्नोर करू लागण्याची शक्यता आहे.
* असेही होऊ शकते की, ती तिच्या करिअरबद्दल किंवा एखाद्या गोष्टीवरुन स्ट्रेसमध्ये असेल. आणि त्यामुळे कदाचित ती तुम्हाला इग्नोर करत असेल. प्रत्येकजण स्ट्रेस घालवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात. अशात तिला काही दिवसांसाठी एकटं सोडलं तर जास्त फायद्याचं होईल.
* कधी कधी इनसिक्यूरिटी फिल होत असल्याने मुली आपल्या बॉयफ्रेन्डला इग्नोर करतात. अशात याची तुम्ही घ्यायला हवी. तिला असं अजिबात फिल होऊ देऊ नका. अशाने तुमचं नातं धोक्यात येऊ शकतं. या गोष्टींचीही भीती असते की, काहीतरी गैरसमज झालेला असेल आणि तिला काही कळत नसेल.
* काही मुली स्वभावाने खूप जास्त लाज-या असतात. हे सुद्धा तुम्हाला इग्नोर करण्याचं कारण असू शकतं. कदाचित तिला हे कळत नसेल की तुमच्याशी कसं बोलावं. अशात तिला थोडा वेळ देणं अधिक गरजेचं आणि महत्वाचं ठरेल. काही मुली ह्या पूर्णपणे मॅच्युअर नसतात. प्रेमाचं नातं कसं टिकवायचं, त्यात कसं वागायचं हे त्यांना कळत नसतं. अशात तुम्ही तिला समजावून सांगा.
* यासोबतच तुमची गर्लफ्रेन्ड तुम्हाला इग्नोर करण्याचं आणखी एक कारण असू शकतं. ते म्हणजे कदाचित ती तुम्हाला चिट करत असेल. आणि त्यामुळे ती तुमच्याशी नजर मिळवत नसेल. चोराच्या मनात चांदणं तशी ही गोष्ट आहे.