बाबो! चक्क कुत्र्याला आवडत नाही म्हणून लोक करतात ब्रेकअप.....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 02:40 PM2019-12-04T14:40:20+5:302019-12-04T14:55:09+5:30
नेहमी घरी आल्यानंतर आपल्या पाळिव कुत्र्यांसोबत खेळणे. त्यांची काळची घेणे. तसेच विकेंड्सला त्या कुत्र्यासोबत वेळ घालवणे.
(Image credit- Paintyyourlife)
नेहमी घरी आल्यानंतर आपल्या पाळिव कुत्र्यांसोबत खेळणे. त्यांची काळची घेणे. तसेच विकेंड्सला त्या कुत्र्यासोबत वेळ घालवणे. अशीच काहीशी अवस्था झालेली असते, ती म्हणजे पाळिव प्राणी पाळणाऱ्या मंडळींची. कारण त्या व्यक्तीला त्या प्राण्याचा लळा लागलेला असतो. त्याचप्रमाणे पाळिव प्राणी आवडणारे दोन व्यक्ती एकमेकांचे मित्र बनलेले असतात. आणि मग त्यानंतर आपल्या लाडक्या डॉगचे आरोग्य स्वस्थ राहण्यासाठी टीप्स शेअर करतात. अलीकडेच एका संशोधनात पाळिव प्राण्यांच्यासंबंधीत एक बाब लक्षात आली आहे.
(Image credit- the find i guide)
'द ट्रूथ अबाउट डॉग पीपल' या रिर्पोटनुसार पाळीव प्राणी पाळणाऱ्या व्यक्तींबद्दल एक धक्कादायक आणि महत्त्वपुर्ण बाब समोर आली आहे. ज्यात खूप लोक आपले रोमॅान्टक नातेसंबंध आपल्या पाळीव कुत्र्याला आवडत नसल्यामुळे तोडतात. आणि आपल्या पार्टनरपासून विभक्त होतात. कारण घरातल्या लोकांना मोठ्या प्रमाणात कुत्र्याची सवय झालेली असते. प्राणी भोवतालच्या परिस्थितीत असलेल्या घटकांच्या अनुषंगाने योग्य ते वर्तन करतात. प्राण्यांच्या वर्तनात मेंदू व तंत्रिका तंत्र यांना फार महत्त्व आहे. भोवतालच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या विविध संवेदना निरनिराळी ज्ञानेंद्रिये ग्रहण करतात.
(Image credit- The modem met)
अनेकजणांना पार्टनरपेक्षा आपल्या डॉगीसोबत फिरायला जायला आवडतं. आपल्या पेट सोबत वेळ घालवल्यानंतर एका प्रकारे आनंद त्यांना मिळत असतो. संशोधनातुन असे समोर आले आहे की, पाळीव प्राण्यांमुळे या व्यक्तींचे मानसिक आरोग्य उत्तम राहत असतं. त्याचबरोबर ताण-तणावातून मुक्तता मिळते. अशा व्याक्तींना आपल्या कुत्र्यांचा सहवास प्रिय असतो. तुलनेने पार्टनरच्या सहवासात असताना त्यांना हवं तस समाधान मिळत नाही.
(image credit-Artsheep)
त्याचप्रमाणे 65 टक्के लोकांना पाळीव प्राण्यांसोबत फोटोस् क्लीक करण्यचा तसेच सेल्फी काढण्याचा मोह आवरता येत नाही. पार्टनरपेक्षा कुत्र्यांसोबत फोटो काढणं त्यांना सुखद वाटतं.