एकतर्फी प्रेमात चुकूनही करू नका या चुका, पडू शकतं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 03:33 PM2018-07-25T15:33:23+5:302018-07-25T15:33:44+5:30
अनेक प्रयत्नांनंतर जेव्हा त्यांना त्यांचं प्रेम मिळत नाही, तेव्हा ते त्यांच्या प्रेमाला एकतर्फी समजतात आणि या एकतर्फी प्रेमाच्या नादात अनेक चुका करतात.
२०१७ मध्ये आलेल्या रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या 'ए दिल है मुश्किल' या सिनेमात एक डायलॉग होती की, 'एक तरफा प्यार की ताकत ही कुछ और होती है. औरों की तरह ये दो लोगों में नहीं बटती, सिर्फ मेरा हक है इस पर...हा डायलॉग फारच हिट झाला होता. खासकरून प्रेम करणाऱ्यांमध्ये हा डायलॉग जास्तच हिट झाला होता. या डायलॉगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एकतर्फी प्रेमाबाबत. आजची तरूणाई या एकतर्फी प्रेमाच्या कचाट्यात अडकत आहे. अनेक प्रयत्नांनंतर जेव्हा त्यांना त्यांचं प्रेम मिळत नाही, तेव्हा ते त्यांच्या प्रेमाला एकतर्फी समजतात आणि या एकतर्फी प्रेमाच्या नादात अनेक चुका करतात. एकतर्फी प्रेमामुळे कधीही खालील चुका करू नये.
तणावाला दूर ठेवा
तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर त्या काहीच गुन्हा नाहीये. पण तुमच्या प्रेमाचा नकारात्मक प्रभाव तुमच्या अभ्यासावर किंवा करिअऱवर पडू शकतो. त्यासोबतच तुम्ही तणावात येऊ शकता. याचा तुमच्या जीवनावर प्रभाव पडू शकतो. नकार ऐकल्यानंतरही तुमच्या जीवनात मिळवण्यासाठी खूपकाही असतं.
दुर्लक्ष करा
जे काही झालं त्यात कुणाची चुकी, कुणाचा दोष या सगळ्यांचा विचार करत बसू नका. प्रेमाला सहजासहजी विसरता येत नाही हे जरी सत्य असलं तरी त्यात अडकून पडू नका. त्या गोष्टींवर दुर्लक्ष करण्यासाठी स्वत:ला दुसऱ्या कामांमध्ये व्यस्त करून घ्या.
चुकीचे पाऊल उचलू नका
कुणाच्याही भडकावल्याने काहीही चुकीचं करू नका. याने तुम्हाला काहीही मिळणार नाही. ज्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे त्याला इजा पोहचवण्याचाही विचार चुकीचा आहे. याने तुम्हाला तुमचं प्रेम मिळणार नाही.
नशेचा आधार घेऊ नका
खऱ्या आयुष्यात सिनेमातील काल्पनिक गोष्टी वापरू नका. या काल्पनिक गोष्टींचा खऱ्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो. दु:खं दूर करण्याच्या नावाखाली नशेचा आधार घेऊ नका. याने तुमचं आयुष्य उद्धस्त होऊ शकतं.