वर्किंग पॅरेंट्स असाल तर कामं सोपी करण्यासाठी 'या' बेस्ट टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 04:00 PM2019-04-17T16:00:07+5:302019-04-17T16:00:49+5:30
तसं पाहायला गेलं तर माणूस संपूर्ण आयुष्यात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो. पण आई-वडिल झाल्यानंतर काही खास जबाबदाऱ्या निभावणं गरजेचं असतं. अशातच जर आई-वडिल कामावर जाणारे असतील तर मग मुलाचा सांभाळ करण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागतात.
(Image Credit : Robert Half)
तसं पाहायला गेलं तर माणूस संपूर्ण आयुष्यात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो. पण आई-वडिल झाल्यानंतर काही खास जबाबदाऱ्या निभावणं गरजेचं असतं. अशातच जर आई-वडिल कामावर जाणारे असतील तर मग मुलाचा सांभाळ करण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागतात. खासकरून वर्किंग वुमन्ससाठी सकाळी उठल्यापासून घर आणि मुलांचं सर्व आवरून ऑफिसला जाणं आणि घरासोबतच ऑफिसच्या जबाबदाऱ्या सांभाळणं अत्यंत अवघड होतं. अशातच आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही प्रत्येक दिवशी तुमची काम अजिबात तणाव न घेता अगदी सहज करू शकता.
काम करताना मुलांची मदत घ्या
प्रत्येक आई-वडिलांचं असं म्हणणं असतं की, मुलांना काही कमी पडू द्यायचं नाही. त्यांची व्यवस्थित काळजी घ्यायची. परंतु लहानपणापासूनच त्यांना स्वतःचं काम स्वतः करायला शिकवलं पाहिजे. त्यांना आत्मनिर्भर बनण्यासाठी मदत करा. त्यांच्या वयानुसार त्यांना जमतील त्या कामांमध्ये त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. उदाहरणार्थ, आपल्या वस्तू जागच्या जागी ठेवणं, झोपेतून उठल्यानंतर आपलं अंथरूण व्यवस्थित करणं. धुतलेले कपडे घड्या करून त्यांच्या जागेवर ठेवणं.
मल्टीटास्किंग
तुम्हाला अशावेळी मल्टीटास्किंग करणं गरजेचं असतं. त्यासाठी आंघोळ करताना बाथरूम स्वच्छ करणं, जेवणं तयार करताना त्याचवेळात वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी लावणं, मुलांचा अभ्यास घेतानाच जेवणामध्ये काय करायचं याचं प्लॅनिंग करणं अशाबाबतीत मल्टीटास्किंग करणं तुम्हाला येणं आवश्यक आहे. यामुळए तुमचं काम लवकर आणि अगदी सहज होण्यास मदत होईल.
(Image Credit : pioneerinstitute.org)
वेळेचा सदुपयोग करणं
मित्र असो किंवा नातेवाईक फोन करणं किंवा कोणतंही राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी ऑफिसच्या लंच ब्रेकचा वापर करा. बस, ट्रेन किंवा मेट्रोमध्ये प्रवास करताना झोप काढण्याऐवजी नाश्ता करा. तसेचं ऑफिसचे मेल चेक करणं किंवा आठवड्याभराचं प्लॅनिंग करण्यासाठी तुम्ही वेळा वापरू शकता.
फ्लेक्सिबल बना
जर शक्य असेल तर आठवड्यामध्ये एक दिवस वर्क फ्रॉम होम करा. असं केल्याने तुम्ही खूप कामं सोपी होतील. ऑफिस जाण्याचा आणि परत येण्याची वेळ वाचेल आणि त्यावेळात तुम्ही घरातील इतर कामं करू शकता.
टिप : आम्ही या सर्व गोष्टी केवळ उपाय म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही.