Emotional Story: हार्टटचिंग स्टोरी: कोरोनामुळे तीन वर्षांनी भेटले; पतीला मिठीत घेताच जीव सोडला...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 04:36 PM2022-11-25T16:36:31+5:302022-11-25T16:37:01+5:30
कोरोनाने अनेकांचे जिवलग, नातेवाईक, मित्र हिरावले आहेत. कोरोना जवळपास संपला असला तरी त्याचे बळी काही संपलेले नाहीत. असाच एक हृदयद्रावक, हृदयस्पर्शी प्रकार घडला आहे.
कोरोनाने अनेकांचे जिवलग, नातेवाईक, मित्र हिरावले आहेत. कोरोना जवळपास संपला असला तरी त्याचे बळी काही संपलेले नाहीत. असाच एक हृदयद्रावक, हृदयस्पर्शी प्रकार घडला आहे. रशियाची तरुणी आणि चीनच्या व्यक्तीची ही कहाणी आहे. कोरोनामुळे तीन वर्षे ते एकमेकांना भेटू शकले नव्हते, पण जेव्हा भेटले तेव्हा तिने हे जगच सोडले.
तरुणीने नाव निक आहे, ती ३० वर्षांची होती. ती रशियाची होती. तर तिचा पती ओयांग हा चीनचा होता. तो ३८ वर्षांचा होता. दोघेही पहिल्यांदा चीनमध्ये एकमेकांना भेटले होते. तेव्हा ते म्युझिक इंडस्ट्रीमध्ये काम करायचे. दोघांनी एप्रिल २०१९ मध्ये लग्न केले. सप्टेंबरमध्ये निक तिच्या आईला भेटण्यासाठी रशियाला गेली होती. ओयांगपण चीनला परतला होता. काही महिन्यांनी पुन्हा ते एकत्र येणार होते. परंतू कोरोनामुळे सारे काही ठप्प झाले आणि ते पुढील तीन वर्षे काही ना काही कारणांनी एकत्र येऊ शकले नाहीत.
अखेर या ऑक्टोबरच्या अखेरीस तो योग जुळून आला होता. ओयांगने सांगितले की, आम्ही दोघेही एकमेकांना मीठीत घेत पाच मिनिटे नुसते रडत बसलो होतो. मी खूप आनंदी होतो. परंतू, घरी परतत असताना वाटेतच निकला श्वास घेताना त्रास जाणवू लागला. मी जवळच्या हॉस्पिटलमध्ये तिला नेले, तिथे डॉक्टरनी तिला कार्डियाक अरेस्ट आला असून तिच्या वाचण्याची शक्यता नसल्याचे म्हटले. तिथून मी तिला १५० किमी दूरवरच्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेले. परंतू वेळ निघून गेला होता. डॉक्टरांनी ती कोमात गेल्या सांगितले.
निकला लहानपणापासूनच आरोग्याशी संबंधीत त्रास होता. चीनला येत असताना तिची तब्येत बिघडली होती. तिच्या मृत्यूनंतर तिने अवयव दान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिचे अवयव दान करण्यात आले आहेत.