लग्न ठरल्यानंतर प्रत्येक मुलींनी 'या' गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 05:02 PM2018-07-14T17:02:45+5:302018-07-14T17:03:21+5:30
लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना असते. लग्नानंतर आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते. मग ती मुलगी असो किंवा मुलगा. हा दोघांच्याही आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो.
लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना असते. लग्नानंतर आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते. मग ती मुलगी असो किंवा मुलगा. हा दोघांच्याही आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. लग्नानंतर मुलगी दुसऱ्याच्या घरी जाते आणि तिचे आयुष्य बदलून जाते. त्यांच्या आयुष्यात फार बदल होतात. संपूर्ण जग बदलून जाते. या साऱ्या गोष्टी सांभाळून त्यांना सर्वांची मने जिंकायची असतात. त्यामुळे लग्न ठरल्यानंतर मुलींनी काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेणे गरजेचे असते.
कुटुंबाला वेळ द्या -
लग्नानंतर मुलगी नवऱ्याच्या घरी जाते. त्यामुळे आई-वडिलांना जास्तीत जास्त वेळ द्या. कारण मुलगी कितीही मोठी झाली तरीही आई-वडिलांसाठी ती नेहमी लहानच रहाते. त्यामुळे लग्न ठरल्याचा आनंद त्यांना होतोच, पण आता आपली मुलगी आपल्यासोबत राहणार नाही, या विचाराने ते बऱ्याचदा व्याकूळही होतात. त्यामुळे त्यांना समजून घेऊन शक्य तेवढा वेळ त्यांना द्या.
जोडीदाराला समजून घ्या -
लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंतचा काळ हा आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक असतो. दोघांना एका नव्या आयुष्याची सुरुवात करायची असते. त्यासाठी एकमेकांना समजून घेणे जास्त गरजेचे असते. त्यामुळे एकमेकांचे स्वभाव, आवडीनिवडी, भविष्याबाबतच्या चर्चा यांसारख्या गोष्टींना प्राधान्य द्या.
मित्र-परिवार -
लग्नानंतर प्रत्येकाच्याच प्रायॉरिटी चेंज होतात. त्यामुळे मित्रमैत्रिणींना आधी जसा वेळ द्यायचात तसा आता देणे शक्य नसते. त्यामुळे त्यांनाही वेळ द्या. एकत्र येऊन पिकनिकचा प्लॅन करा. अथवा कुठेतरी फिरायला जा.
आर्थिक स्वातंत्र्य -
तुमच्या होणाऱ्या नवऱ्याचा पगार किती आहे याहीपेक्षा तुम्ही स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणे गरजेचे असते. आता काळ बदलला असल्यामुळे बऱ्याच मुली स्वतःच्या पायावर उभ्या असतात. त्यामुळे आर्थिक गोष्टींबाबतही दोघांनी चर्चा करणे गरजेचे असते.
जोडीदाराच्या कुटुंबियांचा आदर करावा -
लग्नानंतर तुम्ही जोडीदाराच्या घरी राहणार असता. त्यामुळे त्याच्यासोबतच त्याच्या कुटुंबियांनाही समजून घेणे गरजेचे असते. त्यांचा आदर करणे गरजेचे असते. असे केल्यामुळे तुम्ही त्यांच्या मनात तुमच्यासाठी जागा करू शकाल.