एक्स बॉयफ्रेन्ड अजूनही स्वप्नात येतो? जाणून घ्या कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 01:34 PM2019-11-06T13:34:03+5:302019-11-06T13:40:20+5:30
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत बरीच वर्षे घालवलेली असता, अशात त्या व्यक्तीबाबत तुमच्या मनात विचार येणे स्वाभाविक आहे. भलेही ती व्यक्ती तुमच्यासोबत नसेल.
(Image Credit : education.onehowto.com)
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत बरीच वर्षे घालवलेली असता, अशात त्या व्यक्तीबाबत तुमच्या मनात विचार येणे स्वाभाविक आहे. भलेही ती व्यक्ती तुमच्यासोबत नसेल. आपला मेंदू हा आयुष्यातील चांगल्या-वाईट क्षणांना लक्षात ठेवतो आणि तेच क्षण आपल्याला स्वप्नाच्या रूपात दिसू लागतात. जेव्हा तुम्हाला वाटतं की, तुम्ही तुमच्या बॉयफ्रेन्डला किंवा गर्लफ्रेन्डला विसरले आणि अचानक ती व्यक्ती तुमच्या स्वप्नात येऊ लागते. ही एक आश्चर्यजनक बाब नक्कीच आहे. पण अनेकदा असं होतं की, तुम्ही तुमच्या वर्तमानातील पार्टनरऐवजी तुमच्या एक्सला स्वप्नात अधिक बघता. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. पण काही निरीक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात.
तुमच्या आयुष्यात नसलेला तुमचा एक्स बॉयफ्रेन्ड तुमच्या स्वप्नात येत असेल तर सामान्यपणे असं होण्याचं कारण तुमचं सब-कॉन्शस मन असतं. यावर तुमचं नियंत्रण नसतं. जर तुमच्यासोबतही असं होतं असेल तर जास्त हैराण होण्याची गरज नाहीये.
याचा अर्थ असा अजिबात नाही की, तुम्ही तुमच्या एक्स बॉयफ्रेन्डवर अजूनही प्रेम करता. त्यामुळे तुम्हाला पडणाऱ्या स्वप्नांचा उगाच काहीही अर्थ काढत बसू नका. तुमच्या एक्स बॉयफ्रेन्डला स्वप्नात बघण्याचा अर्थ असा अजिबात नाही की, आजही तुमच्या मनात त्याच्याविषयी प्रेम भावना आहे.
एक्स बॉयफ्रेन्डला किंवा गर्लफ्रेन्डला स्वप्नात बघण्याच एक अर्थ असाही असू शकतो की, त्या व्यक्तीने तुम्हाला फार खोलवर जखम दिली आहे. तुम्ही अजून हे समजू शकला नाहीत की, कसं एखादी व्यक्ती कुणासोबत असं करू शकते.
हे गरजेचं नाही की, एक्स बॉयफ्रेन्ड किंवा गर्लफ्रेन्डसोबत घालवलेला प्रत्येक क्षण बेकार असतील. तुम्ही कधीना कधी एकत्र असे क्षण घालवले असतील जे कधीही विसरता येत नाहीत, आणि या क्षणांमुळेच एक्स तुमच्या स्वप्नात येतात.
एक्स बॉयफ्रेन्डसोबत एखादी अशी न सोडवली गेलेली समस्या अशा स्वप्नांचं कारण बनते. याच दोघातील न सोडवल्या गेलेल्या समस्येमुळेही एक्स स्वप्नात येऊ शकतात. ही समस्या दूर करायची असेल तर जुन्या गोष्टींचा फार विचार करणं बंद करावं.