फेरारी आणि मोटारसायकलची रस्सीखेच. जिंकणार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2016 01:08 PM2016-06-17T13:08:33+5:302016-06-17T18:39:15+5:30

फेरारी आणि केटीएम सुपरड्युक यांमध्ये जर रस्सी खेच झाली तर तुम्हाला काय वाटते कोण जिंकेल?

Ferrari and motorcycle rope. Who will win? | फेरारी आणि मोटारसायकलची रस्सीखेच. जिंकणार कोण?

फेरारी आणि मोटारसायकलची रस्सीखेच. जिंकणार कोण?

Next
प्रसिद्ध स्पोर्ट्स कार फेरारी आणि सुसाट स्पोर्ट्सबाईक केटीएम सुपरड्युक यांमध्ये जर रस्सी खेच झाली तर तुम्हाला काय वाटते कोण जिंकेल?

आता फेरारी कारचे वजन आहे सुमारे 1587 किग्रॅ. आणि सुपरड्युकचे ईनमिन 181 किग्रॅ. फेराराचे इंजिन मागच्या दोन चाकांना 950 हॉर्सपॉवरची ताकद प्रदान करते तर सुपरड्युकचे इंजिन मागच्या एका चाकाला केवळ 180 हॉर्सपॉवर देते.

आता यावरून तुम्हाला दोघांच्या शक्तीचा अंदाज आला असेल. मग एका दोरखंडाच्या दोन टोकांना या दोन अजस्र गाड्या बांधल्या तर कोणकोणाला खेचून नेईल?

तुम्ही म्हणाल - सोप्पं आहे. फेरारी पहिल्याच सेकंदात ड्युकला फरफटत ओढत घेऊन जाईल.

पण थांबा! या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी काही महाभागांनी हे प्रत्यक्षात करून पाहण्याचे ठरवले. आता हा व्हिडिओच पाहिल्यावर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल. 

मान्य की या रस्सीखेचमध्ये फेरारीच जिंकणार पण ड्युकाटी एवढ्या सहजासहजी हार मानत नाही हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. फेरारीचे वजन जास्त, शक्ती जास्त पण तरीही ड्युकाटीला ओढण्यात तिलादेखील जोर लावावा लागला.



यामागे रहस्य काय हे माहिती नाही; पण सुरुवातीला फेरारीच्या ‘डाव्या हाताचा खेळ’ वाटत असणारी ही स्पर्धा एवढी चुरशीची होईल असा कोणीच विश्वास केला नसता.

Web Title: Ferrari and motorcycle rope. Who will win?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.