फेसबुकच्या ‘अकिला’चे पहिले यशस्वी उड्डाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2016 07:00 PM2016-07-21T19:00:12+5:302016-07-22T00:32:08+5:30

सौरऊर्जेवर उडणाऱ्या ‘अकिला’ ड्रोनने अमेरिकेतील अ‍ॅरिझोना येथील सैनिक विमानतळावरून पहिले यशस्वी उड्डाण पूर्ण केले.

The first successful flight of Facebook's 'Akila' | फेसबुकच्या ‘अकिला’चे पहिले यशस्वी उड्डाण

फेसबुकच्या ‘अकिला’चे पहिले यशस्वी उड्डाण

Next
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">संपूर्ण जगात इंटरनेट पोहचविण्याचे महत्त्वकांक्षी स्वप्न फेसबुकचा निर्माता संस्थापक मार्क झुकेरबर्गने पाहिले आणि त्यादृष्टीने आता पहिले पाऊल, नाही, पहिले उड्डाण त्याने केले आहे. फेसबुक निर्मित मानवरहित आणि संपूर्णत: सौरऊर्जेवर उडणाऱ्या ‘अकिला’ ड्रोनने अमेरिकेतील अ‍ॅरिझोना येथील सैनिक विमानतळावरून पहिले यशस्वी उड्डाण पूर्ण केले.
 
बोर्इंग ७३७ विमानाच्या पंखाच्या आकाराचे पंख असणारे ‘अकिला’ कमी उंचीवर अपेक्षेपेक्षा तीन मिनेट जास्त काळ, सुमारे ९६ मिनिटे हवेत राहिले. मागील काही महिन्यांपासून या स्वयंचलित ड्रोनची चाचणी सुरू होती. परंतु २८ जून रोजी केलेल्या पहिल्या यशस्वी विमान उड्डाणाचा व्हिडियो मार्क झुकेरबर्गने आपल्या फेसबुक पेजवर गुरुवारी (ता. २१) शेअर करून संपूर्ण जगाला याची माहिती दिली.
 
यशस्वी उड्डाण झाल्यावर झुकेरबर्ग आणि सहकाऱ्यांनी एकच जल्लोष करत एकमेकांना टाळ्या देत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी झुकेरबर्गच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा होता. इंटनेटपासून वंचित लोकांना‘अकिला’ ड्रोनद्वारे इंटरनेट सुविधा पुरवून जगाला एकत्रित करण्याचे स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार याची अनुभूती बहुधा त्याने प्रथमच घेतली असावी.

Aquila
 
काय आहे अकिला?
 
आकाशात घिरट्या मारणारे ‘अकिला’ ड्रोन नवीन लेझर-बीम तंत्रज्ञानाद्वारे ९६ किमी त्रिज्येतील लोकांना जलद इंटरनेट सुविधा पुरवणार आहेत. ‘अकिला’ने प्रक्षेपित केलेले सिग्नल्सला जमिनीवर असणारे टॉवर्स आणि अँटेना वाय-फाय किंवा ४-जी नेटवर्कमध्ये रुपांतरित करतील, अशी सर्व साधारण संकल्पना आहे.
 
पण हे खरंच व्यवहार्य आहे का?
 
ही संकल्पना प्रत्यक्षात आणि व्यवहारिक स्वरुपात उपयोगात आणण्यासाठी फेसबुकला अनेक दिव्यांना सामोरे जावे लागणार आहे. लगातार तीन महिने जमिनीपासून साठ हजार फूट किंवा त्यापेक्षा जास्त उंचीवर उडणाचे ध्येय फेसबुकने ठेवले आहे. ते साध्य करण्यासाठी तर सर्व प्रथम ड्रोनला दिवसभरात एवढी सौरऊर्जा जमा करावी लागेल ज्याद्वारे ते दिवसरात्र उडू शकेल. शिवाय एवढी प्रचंड ऊर्जा साठवणाऱ्या बॅटरीज खील विकसित कराव्या लागणार. 
 
सौरऊर्जेवर उडणारे चालकरहित विमान आजमितीला केवळ दोन आठवडे लगातार उडू शकले आहे. फेसबुकच्या अभियांत्रिकी विभागाचे उपाध्यक्ष जय पारीख म्हणाले की, ‘अजून खूप मोठा टप्पा गाठायचा बाकी आहे.’

Web Title: The first successful flight of Facebook's 'Akila'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.