ब्रेकअपनंतर 'या' कामात बिझी असतात मुली!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 01:06 PM2020-02-04T13:06:05+5:302020-02-04T13:06:33+5:30
रिलेशनशीपमध्ये असलेले कपल्स एकमेकांना जवळून ओळखत असतात.
(image credit- date my pet)
रिलेशनशिपमध्ये असलेले कपल्स एकमेकांना जवळून ओळखत असतात. असं असलं तरी काही कारणामुळे नातं तुटतं. त्यावेळी अर्थात पार्टनर सोबत ताटातूट होत असते. कारण तुम्हला पार्टनर सोबत अधिक काळ राहायचं नसतं. ब्रेकअप झाल्यानंतर स्वतःला सांभाळणं खूपच कठिण काम असतं. अनेकदा त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी खूप वेळ लागत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का ब्रेकअपनंतर मुली काय करतात. आज आम्ही तुम्हाला ब्रेकअप झाल्यानंतर मुली काय करतात. याबद्दल सांगणार आहोत.
पार्टनरकडे गुपचूप लक्ष ठेवणे
अनेक मुली ब्रेकअपनंतर नात्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यांना त्यांच्या एक्स पार्टनरच्या हालचालींवर आणि सोशल मीडीया स्टेटसवर लक्ष ठेवायचं असतं. त्यांना हे पाहायचं असतं की त्यांचा एक्स पार्टनर इतर मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये आहे की नाही. त्यामुळे मुली तुमच्या कॉमन फ्रेन्ड्च्या अधिक संपर्कात असतात. म्हणून एक्सची ऑनलाईन असण्याची वेळ, पोस्ट यांकडे मुलींचं लक्ष असतं.
ब्लॉक, अनब्लॉक
(Image credit-sameecards)
मुली अनेकदा सोशल मिडियावर आपल्या एक्स पार्टनरला ब्लॉक करतात. मग काही वेळानंतर पुन्हा अनब्लॉक करतात. कारण त्यांना इनडायरेक्टली आपला पार्टनर काय करत आहे. किंवा त्याच्या आयुष्यात काय चाललं आहे. हे जाणून घ्यायचं असतं. पण राग दाखवण्यासाठी मुली मुलांना ब्लॉक करत असतात. ब्रेकअप झाल्यानंतर मुली सोशल मिडियावर एक्टीव्ह असतात. कारण त्यांना तुम्ही त्यांच्याशिवाय आयुष्य कसं जगत आहात हे पाहण्यात खूप इंटरेस्ट असतो. ( हे पण वाचा-या' राशीचे पुरूष असतात लकी, महिला लगेच होतात त्यांच्याकडे आकर्षित )
फ्लर्टिंग
(image credit-www.mnn.com)
अनेक मुली ब्रेकअप झाल्यानंतर एकट्या पडलेल्या असतात. कारण रोज ज्या व्यक्तीसोबत फोनवर बोलण्याची अथवा भेटण्याची सवय झालेली असते. त्याच्यासोबत ब्रेकअप झालेलं असतं. म्हणून मुली सोशल मीडियावर इतर मुलांशी बोलतात. त्यांचाशी फ्लर्ट करतात. तर काहिंना ब्रेकअप झाल्यानंतर शॉपिंग करायला जायला खूप आवडत असतं. तसंच आपल्या एक्स बॉयफ्रेन्डला जळवण्यासाठी इतर मुलांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात.
मित्रमैत्रिणींचा आधार
मुली ब्रेकअपनंतर एकटं वाटू नये म्हणून आपल्या मित्रमैत्रिणींना अधिक वेळ देतात. कारण एक्स बद्दल डोक्यात अनेक विचार येत असतात. त्यावेळी स्वतःला आधार देण्यासाठी मित्र मैत्रिणीना अधिकवेळ देतात. तर काहीजण ताणतणाव हलका करण्यासाठी शॉपिंग करतात. कारण मुलींना शॉपिंग करायला खूप आवडत असतं. ( हे पण वाचा-गर्लफ्रेन्डपासून 'या' गोष्टी लपवण्याच्या प्रयत्नात असतात बॉयफ्रेन्डस्)