लग्न टाळण्यासाठी ही 5 कारणे देतात मुली!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 04:33 PM2018-07-04T16:33:06+5:302018-07-04T16:33:39+5:30
काही ना काही कारणे सांगत हा विषय टाळला जातो. मुली लग्न टाळण्यासाठी वेगवेगळी कारणे देतात. चला जाणून घेऊया मुलींची लग्न टाळण्यसाठीची काही कारणे....
लग्न हा दोघांसाठीही आयुष्यातील मोठा आणि महत्वाचा निर्णय असतो. घरी लग्नाचा विषय निघाला की, मुलगा असो वा मुलगी दोघेही वेगवेगेळी कारणे देत हा विषय टाळताना दिसतात. काही ना काही कारणे सांगत हा विषय टाळला जातो. मुली लग्न टाळण्यासाठी वेगवेगळी कारणे देतात. चला जाणून घेऊया मुलींची लग्न टाळण्यसाठीची काही कारणे....
1) शिक्षण
लग्न टाळण्यासाठी मुलींचं सर्वात कॉमन आणि पहिलं कारण असतं. कोणत्याही एखाद्या कोर्सचा हवाला देऊन किंवा डिग्री करण्याचं कारण देत त्या लग्न करण्यास नकार देतात. यानंतरच लग्नाचा विचार करणार असे त्या सांगतात.
2) करिअर
जर शिक्षणाचं सांगितलं नाही तर त्यांच्या लग्न टाळण्याचं दुसरं शस्त्र असतं ते करिअरचं. आजकाल केवळ मुलंच नाहीतर मुलीही आपल्या करिअर आणि स्वप्नांबाबत जागृत झाल्या आहेत. आणि जोपर्यंत काही मिळवत नाहीत तोपर्यंत त्यांनाही लग्नासारख्या नात्यात अडकायचं नसतं.
3) आर्थिक स्थिती
आता पगार चांगला नाहीये, आर्थिक स्थिती तितकी मजबूत नाहीये. अशीही कारणे काही मुली देतात. कारण काही मुलींना लग्नाआधीच आपलं घर, गाडी, बॅंक बॅलन्स हवं असतं. त्यानंतरच त्यांना लग्न करायचं असतं.
4) एक्ससोबत प्रेम
जर आधीपासूनच घरच्यांना एक्स रिलेशनशिपबाबत माहीत असेल तर मुली हे कारण देण्यालाही मागेपुढे पाहत नाहीत. त्या अजूनही एक्ससोबत भावनात्मक रुपाने जोडलेल्या असतात. पण लग्नासाठी त्या अजूनही तयार झालेल्या नसतात.
5) कुणी मिळालं नाही
इतर कारणे सांगून झाल्यावर काही मुली या अजून कुणी चांगलं मिळालं नाही. त्यांना अरेंज्ड लग्न नकोय, प्रेम विवाहासाठी अजून कुणी मिळालं नाही. असेही कारणे मुली देतात.