Happy Daughter Day : ... त्यामुळे वडिलच असतात मुलींसाठी 'सुपरहिरो'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 11:33 AM2018-09-23T11:33:52+5:302018-09-23T12:10:44+5:30

वडिल अन् मुलाच्या नात्यात एक वेगळंच अंतर असतं. पण, वडिल अन् मुलीच्या बॉण्डींगच एक वेगळचं नात असतं.

Happy Daughter Day: ... so for the Father is gir's 'superheroes' | Happy Daughter Day : ... त्यामुळे वडिलच असतात मुलींसाठी 'सुपरहिरो'

Happy Daughter Day : ... त्यामुळे वडिलच असतात मुलींसाठी 'सुपरहिरो'

Next

मुंबई - आज देशभरात डॉटर डे म्हणजे लाडक्या लेकीचा दिवस साजरा करण्यात येत आहे. आई-वडिलांकडून आपल्या मुलीवरील प्रेम व्यक्त करण्याचा आजचा दिवसं. आई आणि वडिलांकडून मुलीला सारखचं प्रेम मिळतं. पण, कुठेतरी या प्रेमात वडिलांची बाजू वरचढ ठरते. कारण, वडिलांच्या कुशीतील मायेची उब लेकीला थोडी अधिकच भावूक करते. तर कितीही रागीट किंवा गरम असलेल्या बाबाला लेकं आपल्या एका स्माईलने नरम करते. आपल्या लेकीच्या एका हास्यापुढे कणखर बापही कापसासारखा मऊ होऊन जातो. 

वडिल अन् मुलाच्या नात्यात एक वेगळंच अंतर असतं. पण, वडिल अन् मुलीच्या बॉण्डींगच एक वेगळचं नात असतं. त्यामुळे मुलावर रागावणार, चिडणारा बाप मुलीसमोर आईस्क्रीमसारखा पिघळून जातो. आपल्या लाडक्या लेकींचा हट्ट पुरवण्यासाठी तो काबाडकष्ट करतो, तर वेळप्रसंगी जगभराशी लढाईची तयारीही ठेवतो. 

त्यामुळे मुलगी असते बाबांसाठी खास 
वडिलांच्या कुशीत मुलींना जास्त माया अन् सुरक्षितता मिळाल्याचे वाटते. वडिल नेहमीच आपल्या मुलींची काळजी घेताना त्यांना तळहातातील फोडाप्रमाणे जपतात, त्यामुळे मुलींही वडिलांच्या कुशीत स्वत:ला सुरक्षित समजतात. 

मुलींच्या आयुष्यात वडिलचं नेहमी सुपरहिरो असतात, त्यामुळे पती जरी हिरो असला तर वडिलचं सुपरहिरो असतात. कारण, वडिलांकडून मुलींची सर्वच इच्छापूर्ती केली जाते. 

घरात चिमुकल्या मुला-मुलींच्या भांडणात नेहमीच आईकडून मुलांची तर वडिलांकडून मुलीची बाजू घेण्यात येते. 
मुली आणि वडिलांच्या मैत्रीचंही एक वेगळचं नात असतं. वडिलचं आपल्या प्रत्येक समस्येचे समाधान आहे, असं मुलींना वाटतं. त्यामुळे वडिल हेच मुलींचे पहिला मित्र असतात. 

मुलींना अगदी लहानपणापासून म्हणजे शाळेतील अॅडमिशनपासून ते नोकरीच्या इंटरव्यूवपर्यंत वडिलांचा नेहमीच सपोर्ट असतो. वडिलांचे लाड अन् प्रेम नेहमीच मुलींना काळजीवाहू बनवतेय. 

मुलीच्या लग्नादिवशी डोक्यावर फेटा बांधून धावपळ करणारा, येणाऱ्या पाहुण्यांना अगदी लवून, हात जोडून नमस्कार करणारा बाप मुलीची पाठवणी करताना धाय मोकळून रडतो.

Web Title: Happy Daughter Day: ... so for the Father is gir's 'superheroes'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.