Friendship Day Bands Idea : घरीच तयार करा खास मित्र-मैत्रिणींसाठी फ्रेंडशिप बॅन्ड्स; पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 17:25 IST2019-08-02T17:24:48+5:302019-08-02T17:25:36+5:30
फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने बाजारात अनेक क्लासी आणि युनिक गिफ्ट्स मिळतील. पण या खास दिवशी तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींसाठी तुमच्या हाताने काहीतरी बनवून देऊ शकता.

Friendship Day Bands Idea : घरीच तयार करा खास मित्र-मैत्रिणींसाठी फ्रेंडशिप बॅन्ड्स; पाहा व्हिडीओ
(Image Credit : bankfarmleisure.co.uk)
ज्या दिवसाची वर्षभर तरुणाई आतुरतेने वाट पाहत असते तो 'फ्रेन्डशिप डे' रविवारी 4 तारखेला साजरा होणार आहे. मैत्रिचं नातं हे वेगवेगळ्या प्रकारे खास असतं. हे अशाप्रकारचं नातं आहे जे प्रत्येकाच्याच आयुष्यात असतं. पण आता टेक्नॉलॉजीच्या या युगात मैत्रीची परिभाषा जरा बदलली की काय असं वाटायला लागलं आहे. पण असं असलं तरिही या दिवशी अनेकजण वेळात वेळ काढून आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटतात आणि हा दिवस सेलिब्रेट करतात.
मैत्रीचं नातं हे जगातलं सर्वात खास नातं असतं हे कुणालाही वेगळं सांगायची गरज नाही. मैत्रीच्या नात्याशिवाय हे जीवन अपूर्ण आहे असे म्हटल्यासही वावगे ठरु नये. मैत्रीचं हे नातं सेलिब्रेट करण्यासाठी तशी तर एका वेगळ्या दिवसाची गरज नसते. कारण मित्रांसाठी प्रत्येकच दिवस खास असतो.
तुम्हीही हा दिवस साजरा करण्याचा विचार करत असाल आणि आपल्या खास मित्राला किंवा मैत्रिणीला एखादं सरप्राइज देण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक हटके गोष्ट सांगणार आहोत.
फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने बाजारात अनेक क्लासी आणि युनिक गिफ्ट्स मिळतील. पण या खास दिवशी तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींसाठी तुमच्या हाताने काहीतरी बनवून देऊ शकता. खरं तर फ्रेंडशीप डेच्या दिवशी मित्र-मैत्रिणींच्या हातात फ्रेंडशिप बॅन्ड बांधला जातो. तुम्ही घरी वेगवेगळे आणि युनिक स्टाइल्सचे फ्रेंडशिप बॅन्ड तयार करू शकता.
सध्या बाजारात अनेक हटके आणि क्लासी फ्रेंडशिप बॅन्ड्स उपलब्ध आहेत. खरं तर फ्रेंडशिप डेचं खरं सेलिब्रेशन फ्रेंडशिप बॅन्ड्सच्या रूपात पहायला मिळतं. शाळा आणि कॉलेजमध्येही मैत्रिचा हा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी मित्रांना फ्रेंडशिप बॅन्ड देण्यात येतात. तुम्हालाही आठवत असेल शिक्षकांपासून लपून आपण फ्रेंडशिप बॅन्ड घेऊन जायचो आणि शळा सुटल्यावर एकच धम्माल करत सर्वांच्या हातात बांधायचो.
यावर्षी तुमच्या खास मित्रमैत्रिणींसाठी स्वत:च्या हाताने फ्रेंडशिप बॅन्ड तयार करा. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आणि महत्त्वाचं म्हणजे, कमी वेळात तुम्ही हे बॅन्ड तयार करू शकता.
पाहा व्हिडीओ :