रिलेशनशिपमधील 'हे' कटू सत्य कुणालाही स्वीकार करायचं नसतं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 12:44 PM2019-08-30T12:44:25+5:302019-08-30T12:44:42+5:30
आपण नेहमीच हा विचार करतो की, आपलं रिलेशनशिप इतरांपेक्षा वेगळं आणि आनंदी असावं. मुळात रिलेशनशिप चांगलं ठेवण्यासाठी दोन्ही पार्टनर्सना फार वेळोवेळी फार मेहनत घ्यावी लागते.
(Image Credit : www.mic.com)
आपण नेहमीच हा विचार करतो की, आपलं रिलेशनशिप इतरांपेक्षा वेगळं आणि आनंदी असावं. मुळात रिलेशनशिप चांगलं ठेवण्यासाठी दोन्ही पार्टनर्सना फार वेळोवेळी फार मेहनत घ्यावी लागते. रिलेशनशिपकडे खऱ्या दृष्टीने पाहिलं गेलं तर रिलेशनशिपमध्ये काहीना काही चढ-उतार येतातच. ज्यासाठी कपल्सना नेहमी तयार रहावं लागतं. चला जाणून घेऊ रिलेशनशिपच्या काही सत्यांबाबत जे कुणाला स्वीकार करायचे नसतात.
१) आपण दुसऱ्यांकडे आकर्षित होऊ शकतो
(Image Credit : youqueen.com)
रिलेशनशिपमध्ये दोन लोक एकमेकांवर प्रेम करतात. पण असं अजिबात नाही की, ते एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होणार नाहीत. रिलेशनशिपमध्ये असतानाही तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता.
२) वेळ न देऊ शकल्याने होऊ शकतं ब्रेकअप
(humans.media)
रिलेशनशिपमध्ये प्रेमासोबतच सोबत वेळ घालवण्यालाही फार महत्व असतं. पण जर तुम्ही एकमेकांसाठी फार कमी वेळ काढत असाल किंवा एकमेकांसाठी पुरेसा वेळ काढू शकत नसाल तर हे तुमचं ब्रेकअफ होण्याचं मुख्य कारण ठरू शकतं.
३) रिलेशनशिप तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतं
तुम्ही आणि तुमचा पार्टनर एकमेकांवर खूप प्रेम करत असाल, पण तुम्हाला हे माहीत असायला हवं की, रिलेशनशिपमध्ये नेहमी आनंदी राहणं किंवा काही कुरबुरी न होणं शक्य नाही. अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमचं रोज भांडणं होऊ शकतं आणि यामुळे तुमचं रिलेशनशिप दु:खाचं कारण ठरू शकतं.
४) लग्नानंतरही येऊ शकतात अडचणी
(Image Credit : lifelovelemons.com)
अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर पार्टनरसोबत लग्न करून जीवनातील सर्व समस्या संपत नसतात. लग्नानंतर जीवन बदलतं आणि तुमच्या जबाबदाऱ्या वाढतात. अशात पदोपदी रिलेशनशिपमध्ये समोर येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी तयार रहा.