लाइफमध्ये एकदा हार्टब्रेक होणं गरजेचं, ही आहेत कारणं!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 12:11 PM2019-02-23T12:11:14+5:302019-02-23T12:19:17+5:30
पहिल्यांदा जेव्हा प्रेमात मन दुखावलं जातं, एखादं नातं संपतं हा अनुभव व्यक्तीचं जीवन बदलवून टाकतो. प्रेम आणि नात्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो.
पहिल्यांदा जेव्हा प्रेमात मन दुखावलं जातं, एखादं नातं संपतं हा अनुभव व्यक्तीचं जीवन बदलवून टाकतो. प्रेम आणि नात्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. ब्रेकअपनंतर जास्तीत जास्त लोक हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात की, त्यांच्या नात्यात काय चुकलं? जुनं नातं विसरून, सिच्युएशनमधून बाहेर येणं सोपं नसतं. पण इथे आम्ही तुम्हाला असे काही पुरावे देत आहोत, ज्यातून हे स्पष्ट होतं की, तुमचं पहिलं ब्रेकअप तुमच्यासाठी एखादं वरदान असल्यासारखं असतं आणि भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं.
नेहमी परीकथेसारखी नसतात नाती
आपल्यापैकी जास्तीत जास्त लोक सिनेमे बघून आणि पुस्तके वाचून रोमॅंटिक आयडियांबाबत विचार करत असतात. जसे की, लॉन्ग ड्राइव्हला जाणे, किसिंग आणि असं बरंच काही. पण जसेही तुम्ही एका रिलेशनशिपमध्ये शिरता तेव्हा तुम्हाला जाणीव होऊ लागते की, या सर्व गोष्टी रिलेशनशिपचा एक भाग आहेत. या गोष्टी म्हणजे रिलेशनशिप नाही. खऱ्या आयुष्यात कपल्समध्ये भांडणे होतात, वाद होतात, रोज त्यांना अॅडजस्ट करावं लागतं जेणेकरून नातं कायम रहावं. कारण रिलेशनशिप कोणतीही परीकथा नाहीये. नातं परफेक्ट करण्यासाठी मेहनत करावी लागते. पहिलं ब्रेकअप त्रासदायक होऊ शकतं, पण यातून नात्याची दुसरी बाजूही तुम्हाला कळते.
मित्रांसारखं दुसरं कुणी नाही
तुमचे मित्र कोणतीही तक्रार न करता तुमचं सगळं ऐकतात, तुम्हाला समजावून सांगतात. अशा मित्रांना आयुष्यातून कधीही दूर करू नये. ब्रेकअप झाल्यावर खरंतर अनेकांना मित्रांची किंमत कळते. तुमचा खरा मित्र किंवा मैत्रिणचं अडचणीच्या काळात तुमच्या बाजूने उभी असते. त्याला तुमच्यासोबत दुसरं कुणी तुमच्यासोबत नसेल तरी फरक पडत नाही.
मन दुखावल्याची वेदना समजू शकता
जेव्हा प्रेमात तुमचं मन दुखावलं जातं तेव्हा तुम्हाला कळतं की, यात किती वेदना होतात. या वेदना समजण्यासाठी मन दुखावलं जाणं गरजेचं आहे. हार्टब्रेकवेळी तुम्हाला राग येऊ शकतो, तुम्ही निराश, उदास राहू शकता, तुमची चिडचिड होऊ शकते, त्यासोबतच असे अनेक इमोशन्स आहेत जे तुम्हाला जाणवतात. हे इमोशन तुम्ही कधीही फेस केलेले नसतात. पण या हार्टब्रेकमधून तुम्हाला कळतात. अशा स्थितीतून कसं बाहेर यायचंय किंवा कसं निपटायचं हे तुम्हाला कळतं. त्यानंतर तुम्ही मेंटपी आणखी स्ट्रॉन्ग आणि समजदार होता.
लाइफ कुणासाठी थांबत नाही
ब्रेकअपच्या माध्यमातून तुम्ही हे समजू शकता की, लाइफ कुणाशिवाय आणि कुणासाठी थांबत नाही. हा पाठ आयुष्यात पुढे जाण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. तुमच्या मनात काही गोंधळ सुरू असो पण तुम्हाला बेडवरून उठावं लागणार आहे. तुम्हाला सर्वांशी बोलायचं आहे. तुम्हाला ऑफिसला जायचं आहे. लाइफ तसंच सुरू ठेवायचं आहे.
दृष्टीकोन बदलतो
ब्रेकअपनंतर कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा आणि विचार करण्याचा दृष्टीकोन बदलतो. तुम्ही फार जास्त विचार करायला लागता. तुम्हाला हे जाणवू लागतं ती, फिलिंग्स इग्नोर करून प्रकरण आणखी किचकट होऊ शकतं आणि समस्या जशीच्या तशीच राहते. पहिल्या ब्रेकअपमधून तुम्हाला सर्वात मोठा जो धडा मिळतो तो हा की, पुढच्या वेळी कुणाला जीव लावण्याआधी ती व्यक्ती योग्य आहे की, अयोग्य याचा दहा वेळा विचार कराल.
स्वत:चे हिरो स्वत: व्हा
तुम्हाला मनाशी ही गाठ बांधावी लागेल की, तुमच्या आजूबाजूला लोक आहेत आणि त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे. पण कुणाकडेही तुमची समस्या दूर करण्यासाठी जादूची छडी नाहीये. तुम्हाला तुमच्या भावना आणि इमोशनवर स्वत: कंट्रोल मिळवावा लागेल. यातून बाहेर येण्याचा मार्गही तुम्हालाच शोधायचा आहे.