'या' 5 कारणांमुळे नको असलेलं नातं जपण्यासाठी झटत राहतात महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 04:58 PM2019-05-31T16:58:28+5:302019-05-31T17:01:25+5:30

अनेकदा आपण ऐकतो की, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात आणि नातं हे पृथ्वीवर निभावलं जातं. पण याच स्वर्गामध्ये बनलेल्या जोड्यांमध्ये आपापसात ताळमेळ नसेल तर हे नातं जास्त दिवस टिकत नाही.

Here is 5 reasons which force women to stay in an abusive relationship | 'या' 5 कारणांमुळे नको असलेलं नातं जपण्यासाठी झटत राहतात महिला

'या' 5 कारणांमुळे नको असलेलं नातं जपण्यासाठी झटत राहतात महिला

Next

(Image Credit : LovePanky)

अनेकदा आपण ऐकतो की, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात आणि नातं हे पृथ्वीवर निभावलं जातं. पण याच स्वर्गामध्ये बनलेल्या जोड्यांमध्ये आपापसात ताळमेळ नसेल तर हे नातं जास्त दिवस टिकत नाही. अशातच विखुरलेलं नातं सावरण्यासाठी महिलांवर कळत नकळत एक प्रेशर येतं. जाणून घेऊया अशी कोणती 5 कारणं आहेत जी कोणत्याही महिलेला नात्यामध्ये तडजोड करण्यासाठी भाग पाडतात. 

(Image Credit : The Conversation)

कन्फ्यूजन 

मनसोपचार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करुनही महिला आपल्या नात्याबाबत कन्फ्यूज राहतात. तसेच आपल्यासोबत होणारा त्रास आणि चुकीच्या वागणूकीसाठी त्या स्वतःलाच दोषी मानतात. ज्यामुळे त्यांच्या आतमध्ये लपलेला आत्मसन्मान कुठेतरी हरवून जातो आणि त्यांना असं वाटतं की, त्यांच्या जगण्याला काही अर्थच नाही.


 (Image Credit : Stylist)

लोकं काय म्हणतील?; याची भिती

अनेकदा महिला समाजाच्या भितीने किंवा लोकं काय म्हणतील याचा विचार करून आपलं नातं संपवत नाहीत. कितीही त्रास झाला तरिही त्या शेवटपर्यंत ते नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात. एवढचं नाही तर अनेकदा त्या आपल्यासोबत होणाऱ्या चुकीच्या गोष्टींबाबत कोणालाही सांगणं टाळतात. 

(Image Credit : psychologytoday.com)

जोडीदार सुधारण्याची आशा 

अनेकदा असा समज असतो की, अशा नत्यामध्ये फक्त कमी शिकलेल्या महिलांच अडकतात. पण हा तुमचा गैरसमज आहे. शिकलेल्या आणि काम करणाऱ्या अनेक महिलाही नात्यामध्ये त्रास सहन करूनही ते नातं निभावत असतात. त्यांना नेहमी असं वाटत असतं की, जर त्या आपल्या जोडीदाराला सोडून निघून गेल्या तर त्यांचा जोडीदार पूर्णपणे तुटून जाईल. भावनांमध्ये गुंतून त्या वर्षानुवर्ष आपलं नातं निस्वार्थीपणे निभावत असतात. 

(Image Credit : DomesticShelters.org)

मुलांच्या भविष्यासाठी 

सिंगल पॅरेंट बनून मुलांची जबाबदारी निभावणं अत्यंत कठिण काम असतं. अशातच गोष्ट जेव्हा महिलांची असते. त्यावेळी त्यांच्या अडचणी आणखी वाढतात. अशातच आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्या स्वतःला या नात्यामध्ये बांधून घेतात. 

कुटुंबाचा दबाव 

आजही आपल्या देशामध्ये नातं तयार करणं आणि ते तोडणं अत्यंत अवघड आहे. जर एखादी महिला आपल्या नात्यामुळे खूश नसेल आणि त्यातून बाहेर येण्याचा विचार करत असेल तर तिच्या कुटुंबातील लोकं तिला ते नातं निभावण्याचा सल्ला देतात. अनेकदा कुटुंबातील लोक कुटुंब, समाज आणि मुलांची शपथ देऊन त्यांना आपलं नातं वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला देतात. 

आर्थिक स्थितीही ठरते कारण 

अनेकदा महिला आर्थिक स्वरूपात कमी असल्यामुळे आपल्या खर्चासाठी जोडीदारावर अवलंबून असतात. ज्या कारणामुळे त्रासदायक नात्यामध्ये राहणं त्यांना भाग पडतं. बऱ्याचदा महिला हादेखील विचार करतात की, जर त्या आपल्या पार्टनरला सोडून निघून गेल्या तर त्यांचं आणि त्यांच्या मुलांचं काय होईल? यांसारख्या विचारांनी हैराण होऊनच त्या नातं टिकवण्यासाठी सतत झटत राहतात. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 

Web Title: Here is 5 reasons which force women to stay in an abusive relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.