रिहानाच्या गाण्याला हेम्सवर्थचा ‘टच’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2016 03:48 AM2016-04-04T03:48:25+5:302016-04-03T20:48:25+5:30

रिहानाच्या ‘वर्क’ या सुपरहीट गाण्याच्या ओळींना  क्रिस हेम्सवर्थने त्याच्या भारदस्त आवाजात वाचून दाखवले.

Hesceworth's 'Touch' song for Rihanna | रिहानाच्या गाण्याला हेम्सवर्थचा ‘टच’

रिहानाच्या गाण्याला हेम्सवर्थचा ‘टच’

Next
आपण सर्वजण ज्याला ‘थॉर’ म्हणून ओळखतो त्या क्रिस हेम्सवर्थने सर्वांना त्याचे काव्यवाचनाचे कौशल्य दाखवून आनंदाचा सुखद धक्का दिला आहे. इंग्लिश गायिका रिहानाच्या ‘वर्क’ या सुपरहीट गाण्याच्या ओळींना त्याने त्याच्या भारदस्त आवाजात वाचून दाखवले.

आगामी ‘द हंट्समन : विंटर्स वॉर’ या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी तो ‘बीबीसी रेडियो 1’ येथे निक ग्रिमशॉच्या ‘द रेडियो 1 ब्रेकफास्ट शो’मध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने रिहानाच्या गाण्याचे जणू काही कविता वाचतोय अशा प्रकारे भावपूर्ण वाचन केले.

‘वाचत असताना माझ्या भावना आणि भूतकाळातील अनुभव डोळ्यासमोर तरंगले. आताच्या आता उठून कामाला जाण्याची प्रेरणा मला मिळाली. बघा मुलांनो! तुम्हीसुद्धा पटकन कामाला लागा ’, असे क्रिस गंमतीने म्हणाला. 

येत्या 22 एप्रिल रोजी ‘द हंट्समन : विंटर्स वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित होत असून क्रिस यामध्ये ‘स्नो व्हाईट अँड द हंट्समन’ चित्रपटातीलच भूमिका पुन्हा साकारतोय. त्याच्यासह चार्लिज् थेरॉन ‘क्वीन रवेना’ म्हणून तर एमिली ब्लंट आईस क्वीन ‘फ्रेया’ आणि जेसिका चॅस्टेन ‘सेराह’च्या भूमिके त दिसणार आहे.



मग रिहाना तुला कसे वाटले?

via GIPHY

Web Title: Hesceworth's 'Touch' song for Rihanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.