'या' 8 शुल्लक कारणांमुळे जोडप्यांमध्ये होतं भांडण; तुम्हाला काय वाटतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 05:06 PM2019-09-25T17:06:56+5:302019-09-25T17:07:36+5:30

कदाचितचं असं कोणतं कपल असेल ज्यांच्यामध्ये अजिबात भांडणं होत नसतील. प्रेमामध्ये रूसवे-फुगवे आलेच. अनेकदा कपल्समध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणं होत असतात.

How to avoid misunderstanding in relationship | 'या' 8 शुल्लक कारणांमुळे जोडप्यांमध्ये होतं भांडण; तुम्हाला काय वाटतं?

'या' 8 शुल्लक कारणांमुळे जोडप्यांमध्ये होतं भांडण; तुम्हाला काय वाटतं?

Next

कदाचितचं असं कोणतं कपल असेल ज्यांच्यामध्ये अजिबात भांडणं होत नसतील. प्रेमामध्ये रूसवे-फुगवे आलेच. अनेकदा कपल्समध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणं होत असतात. अनेकदा ही भांडण शुल्लक गोष्टींवरून तर काही वेळेस ही भांडणं अगदी शुल्लक कारणांवरून होतात. 

आज आम्ही तुम्हाला काही अशी कारणं सांगणार आहोत जी, कपल्समध्ये भांडणं होण्यासाठी कारणीभूत ठरतात. जाणून घेऊया कारणं... 

रिमोट

घरामध्ये भांडण्याचं सर्वात छोटा आणि शुल्लक विषय म्हणजे, रिमोट. अनेकदा मुलं रिमोटवरून भांडतात पण तेच जर नवरा-बायको भांडू लागले तर मात्र काही खरं नाही. नवऱ्याला क्रिकेट मॅच किंवा न्यूज पाहायच्या असतात आणि बायकोला सिरियल्स. यावरून दोघांमध्ये भांडणं सुरू होतात. 

बिछान्यावर ओला टॉवेल टाकणं 

अनेकदा बायको आपल्या नवऱ्याला सांगून सांगून थकते की, ओला टॉवेल बिछान्यावर टाकू नका. बायको घराला व्यवस्थित ठेवते आणि नवरा मात्र सगळीकडे पसारा घालून ठेवतो. परंतु, बायकोलाही या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की, कोणत्या गोष्टीवरून कधी वाद घातला पाहिजे. अनेकदा ऑफिसला जाण्याच्या गडबडीमध्ये नवरा टॉवेल तसाच टाकून निघून जातो आणि त्यानंतर भांडणाला सुरुवात होते. 

कोणतीच गोष्ट ऐकून न घेणं 

अनेकदा असं होतं की, जेव्हा एखादा व्यक्ती आपलं म्हणणं नॉन स्टॉप सांगत असतो आणि समोरची व्यक्ती त्याचं अजिबात ऐकत नाही किंवा एखाद्या कामामध्ये व्यस्त असते. त्यावरूनही अनेकदा भांडणं होतात. 

एकमेकांच्या कुटुंबियांचा अपमान करणं 

अनेकदा कपल्स एकमेकांच्या घरातील व्यक्तींचा अपमान करतात. पत्नी आपल्या सासूच्या तक्रारी करते आणि पुरूष त्यांच्या सासरच्या व्यक्तींना घालून पाडून बोलतात. यावरून दोघांमध्ये भांडणांना सुरुवात होते. 

जेवणावरून भांडणं 

'आज जेवणामध्ये काय आहे?' पासून 'जेवणासाठी काय बनवू?' पर्यंत नवरा-बायकोमध्ये खूप भांडणं होतात. तसेच अनेकदा जेवण आवडलं नाही म्हणून भांडणं होतात तर अनेकदा बनवलेलं जेवण खाल्लं नाही म्हणून भांडणं होतात. 

ओल्या फरशीवर चालणं

अनेकदा ओल्या फरशीवर चालल्यामुळेही नवरा-बायकोमध्ये भांडणं होतात. बायकोने घरात साफ-सफाई केली आणि तेवढ्यात ओल्या फरशीवर जर नवऱ्याने पाय ठेवला तर दोघांमध्ये भांडणं होतात. 

झोपेत घोरण्याची सवय

काही लोकांना झोपल्यानंतर घोरण्याची सवय असते. परंतु त्यांच्या आजूबाजूला झोपणाऱ्या व्यक्तींना घोरल्यामुळे झोप येत नाही. त्यामुळे दोघांमध्ये भाडणं होतात. 

मुलांचा अभ्यास

मुलांचा अभ्यास आणि त्यांची प्रगती या गोष्टी पालकांच्या हातात असतात. परंतु, मुल जर ट्रॉफी घरी घेऊन आलं तर 'शेवटी मुलगा कोणाचा आहे' या एका वाक्यावरूनही दोघांमध्ये भाडणं होतात. मुलाच्या यशामागे फक्त आणि फक्त माझचं श्रेय आहे, हा दावा करण्यासाठी दोघेही झटट असतात. 

शेवटी म्हणतात ना, भांडल्याने प्रेम वाढतं. असचं काहीसं नवरा-बायकोचं नातं असतं. या नात्यामध्ये रूसवे-फुगवे असतात. भांडणं असतात. पण प्रेमही असतं. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)

Web Title: How to avoid misunderstanding in relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.