प्रेमात पडल्यावर मुलांमध्ये काय बदल होतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 04:44 PM2018-04-11T16:44:29+5:302018-04-11T16:45:22+5:30
गर्लफ्रेन्ड जीवनात येताच मुलाचं जीवन बदलून जातं. हे काही वेगळं सांगायला नको. गर्लफ्रेन्ड जीवनात येताच मुलांकडे मित्रांसाठी वेळ नसतो.
अलिकडे प्रत्येक दुस-या तरुणाच्या जीवनात एक तरी गर्लफ्रेन्ड असतेच. गर्लफ्रेन्ड जीवनात येताच मुलाचं जीवन बदलून जातं. हे काही वेगळं सांगायला नको. गर्लफ्रेन्ड जीवनात येताच मुलांकडे मित्रांसाठी वेळ नसतो. याचा आनुभव अनेकांना आला असेल. तसेच अनेक बदल बघायला मिळतात. तुमच्याही मित्रांनी तुम्हाला काहीतरी कारण देत कलटी मारली असेलच!
गर्लफ्रेन्ड जीवनात आल्यावर मुलं सर्वातआधी खोटं बोलायला शिकतात. गर्लफ्रेन्डला राग येऊन नये यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारची कारणी देत असतो. पण प्रेम मुलांना फक्त वाईटच सवयी शिकवतं असं नाहीये. काही चांगल्याही सवयी प्रेमात शिकायला मिळतात. त्यातीलच एक म्हणजे महिलांचा सन्मान करणं.
प्रेमात पडल्यावर बेशिस्त मुलांना वेळेचं अधिक महत्व पटतं. जे आधी कधीही समजलेलं नसतं. गर्लफ्रेन्डला भेटण्यासाठी वेळेत पोहचण्यासोबतच मुलं ऑफिसमध्येही वेळेवर पोहचतात. प्रेमात पडलेला मुलगा हा आपल्या मित्रांनाही करिअर आणि नात्याचे डोज देऊ लागतो.
मुलांना जर चांगली पार्टनर मिळाली तर त्यांचं आयुष्य सुखी होतं. ते योग्य मार्गाने जगू लागतात. यासोबतच प्रेमात पडलेला मुलगा आपल्या जबाबदा-या समजून घेण्यालाही सुरूवात करत असतो. प्रत्येक नात्याला महत्व देणं सुरू करतो.
सर्वात मोठा बदल म्हणजे जबाबदारी समजून घेणं ही आहे. कारण प्रेमात पडणं सोपं आहे पण ते नातं टिकवून ठेवणं. मजा-मस्तीसोबत करिअर सांभाळणं. वेगळ्याच विचारांच्या पार्टनरला समजून घेणे हे बदल देखील मुलांमध्ये बघायला मिळतात. प्रेम हे करायला सोपं वाटतं पण ते शेवटपर्यंत टिकणं जरा कठिण आहे पण अशक्य नाही.
अनेक वाद-विवाद होतात. पण अशातही ऎकमेकांवरचा विश्वास तुटू न देणं महत्वाचं असतं. अनेकांमध्ये हे दिसत नाही. छोट्या छोट्या कारणांनी नातं तोडण्याकडे अनेकांचा कल दिसतो.