म्हणून गर्लफ्रेंड तुमचा फोन चेक करते, जाणून घ्या फोन चेक करण्यापासून रोखण्याचा खास फंडा....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 02:31 PM2020-01-26T14:31:46+5:302020-01-26T14:35:59+5:30
अनेकदा रिलेशनशीपमध्ये असताना पार्टनर आणि तुमच्यात भांडण होत असतात.
(image credit-vicinito)
अनेकदा रिलेशनशीपमध्ये असताना पार्टनर आणि तुमच्यात भांडण होत असतात. भांडण जर झाली नाहीत तरी संशय नावाची गोष्ट ही सगळ्याच रिलेशनशीपमध्ये असते. आपल्या पार्टनरबद्दल संशय वाटणे हे ब्रेकअपचं सगळ्यात मोठं कारण असू शकतं. अनेक मुली किंवा मुलं आपल्या पार्टनरवर जर त्यांना डाऊट येत असेल तर पार्टनरचा फोन चेक करण्यासाठी फार उताविळ असतात. जर तुमचा पार्टनर तुमचा फोन चेक करत असेल आणि तुम्ही या गोष्टीला स्ट्रॉंग रिलेशनशीप समजत असाल तुम्ही मोठी चुक करत आहात. तर मग जाणून घ्या रिलेशनशीप प्रोब्लेमपासून कशी सुटका मिळवायची.
मुली मुलांच्या फोनमध्ये काय चेक करतात.
मुली मुलांच्या फोनमध्ये कॉस हिस्ट्री आणि व्हॉस्टएप चॅट चेक करतात. जर तुम्ही रात्रीच्या वेळी कोणाशी चॅट करत असाल आणि चेक करताना पार्टनरने ते पाहीलं तर तुमची जोरदार भांडण होण्याची शक्यता असते. सोशल मिडीयामुळे अनेक नाती ही कोर्टापर्यंत पोहोचत असतात. जर फोनच्या वापरामुळे तुमच्या रिलेशनशीपमध्ये भांडण होत असतील तर तुम्हाला तुमचं नातं वाचवण्याची आवश्यकता आहे. मग हा नंबर कोणाचा आहे, इतक्या रात्री माझ्याशी न बोलता इतर मुलींशी का बोलतोस. अशी भांडणाची सुरूवात होते.
फोन चेक करण्यामागची कारणं
फोन चेक करण्याचं कारण वेळ न देणे हे असू शकतं. सुरूवातीला जेव्हा तुम्ही रिलेशनशीपमध्ये येता त्यावेळी पार्टनरला पूर्णवेळ देत असता त्यामुळे पार्टनरच्या तुमच्या कडून असेलेल्या अपेक्षा वाढत जातात. पण नंतर जर तुम्ही वेळ दिला नाहीत तर त्रासदायक ठरू शकतं. मग तुला आता माझ्यासाठी वेळच नाही का? माझ्यासोबत राहून बोअर झालास, जर वेळच नाही तर आपण रिलेशनीपमध्ये का आहोत. असे डाएलॉग ऐकायला मिळत असतात. पण तुमच्यासोबत जर असं होत असेल तर पार्टनरला वेळ द्या. कारण अशा परिस्थितीत तुम्ही पार्टनरला इग्नोर कराल तर तुमच्यावर जास्त संशय घेण्याची शक्यता आहे.
कोणतंही नातं हे विश्वासावरचं टिकत असतं. जर तुमची पार्टनर तुमच्यासोबत रिलेशनशीलमध्ये असताना इन्सिक्यूअर फिल करत असेल तर सोशल मिडीयावर गुप्तपणे तुमच्यावर लक्ष ठेवण्याचं काम पार्टनर कडून केलं जाऊ शकतं.
(image credit atlmfonline.com)
अनेकजण लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप (Long Distance Relationship) मध्ये राहिल्यामुळे त्यांच्या नात्यात विश्वासाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे नातं तुटण्याची शक्यता असते. जर तुम्हाला नातं टिकवून ठेवायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं आवश्य़क आहे. महिन्यातून एकदातरी टूरला जा, कितीही कामात व्यस्त असाल तरी पार्टनरला नक्की फोन करा, आपल्या पार्टनरची काळजी घ्या.
गर्लफ्रेन्ड फोन चेक करत असाल तर कसं थांबवाल
(image credit- love pinky)
जर तुम्ही गर्लफ्रेन्डच्या सवयीमुळे हैराण असाल तर समजदार पार्टनरप्रमाणे वागा. जर या गोष्टीमुळे पार्टनर रागवत असेल तर फोन देण्यासाठी नाही म्हणू नका.जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेन्डला धोका देत नसाल तर बेफिकीरपणे पार्टनरकडे फोन द्या. पार्टनला समजवण्याचा प्रयत्न करा. ही गोष्ट पण समजवा की रिलेशनशीपमध्ये असताना एकमेकांना प्राईव्हसी देणं सुद्धा तितकचं महत्वाचं असतं.