तुमची पार्टनर डॉमिनेटिंग आहे की नाही कसं ओळखाल? 'या' टिप्सने हॅण्डल करा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 04:32 PM2020-04-20T16:32:14+5:302020-04-20T16:50:32+5:30
मुलांमुलींना वेगवेगळ्या स्वभावाचे वेगवेगळ्या विचारांचे पार्टनर चालतील. पण डॉमिनेटिंग पार्टनर कोणालाही आवडत नाही.
रिलेशनशिपमध्ये कपल्सचे स्वभाव वेगवेगळे असतात. कधी एकमेकांचे विचार पटतात तर कधी पटत नाही. मुलांमुलींना वेगवेगळ्या स्वभावाचे वेगवेगळ्या विचारांचे पार्टनर आवडतात. पण डॉमिनेटिंग पार्टनर कोणालाही आवडत नाही. आज आम्ही तुम्हाला पार्टनर डॉमिनेटिंग असेल तर कसं ओळखाल किंवा कसं हॅण्डल करायचं याबाबत सांगणार आहोत.
कोणतीही गोष्ट तुमची पार्टनर तुमच्यावर थोपवत असेल तर तुमचा पार्टनर डॉमिनेटिंग आहे. रिलेशनमध्ये आल्यानंतर सुरूवातीला याबाबत कल्पना नसते. पण नंतर हळूहळू वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. तेव्हा पार्टनरचा मुळ स्वभाव समजतो. काहीवेळा अशा स्वभावामुळे तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक स्वरूपाचा त्रास होण्याची शक्यता असते. चला तर मग जाणून घेऊया कसे वागतात डॉमिनेटिंग पार्टनर.
स्वतःच्या मनाप्रमाणे वागणं
जर तुमची गर्लफ्रेंड कोणत्याही गोष्टीत तुमचा सल्ला न घेता स्वतःच्या मनाप्रमाणे वागत असेल तिचा स्वभाव डॉमिनेटिंग आहे. अशा मुली प्रत्येक गोष्टीत स्वतःचं मत कसं योग्य आहे. हे सांगण्याच्या प्रयत्नात असतात. काहीवेळा नंतर अशा लोकांसोबत रिलेशनशिप टिकवणं अवघड होऊन बसतं.
नेहमी इतरांची चूक दाखवणं
डॉमिनेटींग स्वभावाच्या मुली नेहमी इतरांची चुक दाखवत असतात. एखाद्यावेळी त्यांची चूक असेल तरी अशा स्वभावाचे लोक सहजासहजी आपली चूक मान्य करत नाही. तसंच अशा स्वभावाच्या मुली आपल्या पार्टनरला पर्सनल स्पेस सुद्धा देत नाही. पार्टनरचं सोशल मीडिया तसंच इतर बारिकसारीक गोष्टीकडे त्यांचं पूर्ण लक्ष असतं. यांना असं वाटतं की पार्टनरने प्रत्येक गोष्ट आपल्याला विचारून मगच करायला हवी.
इगो खूप जास्त
डॉमिनेटिंग स्वभावाच्या मुलींना त्यांच्याशिवाय इतरांचे कौतुक केलेलं आवडत नाही. त्यांना खूप अहंकार असतो. मस्करी करताना सुद्धा कोणाविषयी सकारात्मक गोष्टी बोललेलं त्यांना खटकतं. त्यामुळे पार्टनरच्या अशा वागण्याकडे दुर्लक्ष करू नका. ( हे पण वाचा-'या' लक्षणांवरून ओळखा तुमचा पार्टनर तुमच्यासाठी योग्य आहे की नाही? )
असं करा हॅण्डल
तुम्हाला तुमच्या पार्टनरचा हा स्वभाव आवडत नसेल तर स्पष्ट शब्दात बोला.
स्वतःचे निर्णय स्वतःच घ्या. काही गोष्टी स्वतंत्रपणे ठरवायला हव्यात असं पार्टनरला समजावून सांगा. नाहीतर तुमची पार्टनर तुमच्यावर वचक ठेवण्याचं काम सुद्धा चांगलं करू शकते.
अनेकदा तुम्ही पार्टनरला काही सांगायला जाता तेव्हा राग येण्याची शक्यता असते. म्हणून नातेवाईकांना किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीची मदत घेऊन आपलं म्हणणं पटवून द्या.
तुमच्या पार्टनरच्या स्वभावातील बदल १ ते २ दिवसात होईल असा विचार करू नका. त्यासाठी काही महिने लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत पेशंन्स ठेवा. पार्टनरला आपली जबाबदारी सांगण्याचा प्रयत्न करा. ( हे पण वाचा-लॉकडाऊनमध्ये पार्टनर सतत चिडचिड करत असेल, तर 'या' टिप्स तुमच्यासाठीच)