जॉबलेस झाल्यानंतर येणाऱ्या समस्या टाळण्यासाठी 'हे' नक्की वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 04:34 PM2020-01-11T16:34:35+5:302020-01-11T16:38:48+5:30

नोकरी सुटणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील ताण-तणाव निर्माण  करणारा प्रसंग असतो.

How to deal with job loss and unemployment stress | जॉबलेस झाल्यानंतर येणाऱ्या समस्या टाळण्यासाठी 'हे' नक्की वाचा 

जॉबलेस झाल्यानंतर येणाऱ्या समस्या टाळण्यासाठी 'हे' नक्की वाचा 

Next

(image credit- freepressjournal.in)

नोकरी सुटणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील ताण-तणाव निर्माण  करणारा प्रसंग असतो. यामुळे प्रत्येक स्त्री किंवा पुरूष ताण-तणावाखाली येत असतो. नोकरी सुटल्यानंतर एका विशिष्ट प्रकारचं दडपण मनावर येत असतं. सध्या आर्थिक मंदिच्या काळात अनेकजणांच्या नोकऱ्या गेल्यामुळे  लोक डिप्रेशनमध्ये जात आहेत. पण असं होणं हि सामान्य बाब आहे. कारण नोकरी गेल्यानंतर एका प्रकारच्या ओझ्याखाली असल्यासारख वाटतं असतं. आयुष्यात अचानक झालेल्या बदलांमुळे नैराश्य येत असतं. पण जर तुम्ही त्या गोष्टी स्वीकारल्या तर तुम्ही पुढे नक्कीच काहीतरी करू शकता. आज आम्ही तुम्हाला जॉबलेस असलेल्या परिस्थिती स्वतःला तुम्ही कसं सावरू शकता हे सांगणार आहोत. 

(image credit- Greter kashmir)

ज्यापद्धतीचे जीवन आपण जगत असतो. त्यात नोकरी जाणे ही असामान्य गोष्ट आहे. या गोष्टीचा आपल्या जीवनावर नकारात्मक परीणाम होत असतो. कारण त्यामुळे मिळकत बंद होणार असते.  मोठ्या नुकसानांचा सामना करावा लागू शकतो. त्यात आपली प्रोफेशनल ओळख, सुरक्षिततेचा अभाव, कामासाठी जोडले गेलेलं सोशल नेटवर्क यांचा समावेश असतो. पण या परिस्थितीत आपण स्वतःला कसं सावरतो हे महत्वाचं  असतं. 

स्वतःला वेळ द्या

Related image

(image credit-chicago santime.com)

नोकरी सुटल्यानंतर त्या गोष्टीचे दुःख विसरण्यासाठी वेळ लागत असतो.  अशावेळी  स्वतःच्या भावना स्वीकारून आपल्या चुकांना सुधारण्याचा प्रयत्न करा. या चुका पुन्हा नव्याने काम करत असताना टाळा. स्वतःला काय वाटत आहे. आपण कुठे चुकत आहोत का या गोष्टींचा विचार करा. 

भावनांना व्यक्त करा

(image credit- buisness standered.com)

जेव्हा तुम्ही नैराश्यात असता तेव्हा  आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी  काहतरी लिहण्याचा प्रयत्न करा. तुमच्यातील उणीवा काय आहेत तसंच कोणच्या गोष्टी स्वतःमध्ये अजून विकसीत करायला हव्यात याचं  आत्मपरिक्षण करा. 

नवीन मित्र बनवा

Related image

नवीन मित्र बनवा किंवा स्पोटर्स कल्ब किंवा सोशल मिडीयाचा वापर करून नवीन माणसांशी बोलण्याचा विचार करा. त्यामुळे तुम्ही जुन्या गोष्टी विसरून नव्याने काम कराल.  कारण चांगले मित्र तुम्हाला नवीन आईडीया देतील. 

आपल्या  कुंटूंबाला वेळ द्या 

( image credit- aisaforlife)

जर  तुम्हाला खूप ताण आला असेल तर आपल्या घरातील लोकांना विश्वासात घेऊन  त्यांना तुमची समस्या सांगा. या कालावधीत घरच्यां व्यक्तींना वेळ दिल्याने तसंच त्यांचाशी मनमोकळ्या गप्पा मारल्याने  तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि ताण हलका होईल.  तसंच घरातल्या व्यक्तींनी दिलेले सल्ले तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरतील 

 भावनांवर नियंत्रण ठेवा

Image result for family

जर  तुम्हाला जास्त राग किंवा  दडपण येत असेल तर ताण घालवण्यासाठी मद्याचे अतिसेवन करणे, बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा.  असं केल्यास तुमचे विचार नकारात्मक होण्याची शक्यता असते.

Web Title: How to deal with job loss and unemployment stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.