मुलांना चांगल्या सवयी ‘आपोआप’ कशा काय लागतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 03:23 PM2017-09-12T15:23:58+5:302017-09-12T15:23:58+5:30

त्यात ‘कष्ट’ नाही, आनंद मात्र खूप आहे..

How do children 'automatically' get good habits? | मुलांना चांगल्या सवयी ‘आपोआप’ कशा काय लागतील?

मुलांना चांगल्या सवयी ‘आपोआप’ कशा काय लागतील?

Next
ठळक मुद्देमूल लहान असतानाच काही सवयी त्यांच्या अंगी बानवल्या पाहिजेत. आपण चांगल्या सवयींचा आग्रह का धरतो आहोेत, हेही मुलांना कळलं पाहिजे.मुलांनी चांगल्या गोष्टी केल्या की त्याचं बक्षीसही त्यांना लगेच मिळालं पाहिजे. शाबासकी देणं, त्यांचा पापा घेणं. प्रेमानं त्यांना मिठी मारणं, प्रोत्साहन म्हणून अगदी छोटीशी भेट कधीतरी देणं.. या गोष्टी मुलांसाठी जास्त प्रेरणादायी ठरतात.मुलांच्या प्रत्येक गोष्टीत पालकांनी इन्व्हॉल्व्ह असणं खूप महत्त्वाचं आहे.

- मयूर पठाडे

या मुलांना वळण लावायचं तरी कसं? प्रत्येक पालकापुढे आज हा महत्त्वाचा प्रश्न असतो. याच प्रश्नानं ते वैतागलेलेही दिसतात. कारण प्रत्येक पालकाची तक्रार असते, मुलं अज्जिबात ऐकत नाहीत..
मुलं ऐकत नाहीत.. हे कारण तसं म्हटलं तर फसवं आहे. कारण आपण अचानक कधीतरी उठतो आणि मुलांना शिस्त, सवयी लावायला पाहतो. कोणतीही गोष्ट अशी अचानक कधीच होत नाही. त्यासाठी ती अगोदर ‘मुरू’ द्यावी लागते. हळूहळू मग तशा सवयी अंगी रुळत जातात.
मुलांना चांगल्या सवयी लावायच्या तर त्याला फार कष्ट लागतात असं नाही, पण त्यात कमालीचं सातत्य मात्र लागतं. तेवढं केलं तर मुलांना चांगल्या सवयी आपोआप लागतील.

मुलांना कशा लावायच्या चांगल्या सवयी?
१- मूल लहान असतानाच काही सवयी त्यांच्या अंगी बानवल्या पाहिजेत. अगदी कडेकोट शिस्त नाही, पण मुलांचा खेळण्याचा वेळ, स्क्रिनसमोरचा वेळ, अभ्यास किंवा इतर काही गोष्टी शिकण्यासाठीचा वेळ.. किमान ढोबळमानानं तरी ठरवून दिला पाहिजे. त्यासाठी अगदी दांडपट्टा घेऊन बसण्याची गरज नाही, पण सर्व गोष्टी होताहेत की नाहीत, याचा आग्रह पालकांनी धरला पाहिजे.
२- आपण चांगल्या सवयींचा आग्रह का धरतो आहोेत, हेही मुलांना कळलं पाहिजे. त्याचे फायदे त्यांच्या लक्षात आणून दिले पाहिजेत. मुलांनाही मग हळूहळू त्याचं महत्त्व पटत जातं.
३- मुलांनी चुकीच्या गोष्टी केल्या म्हणजे आपण त्यांना रागवतो, पण त्यांनी काही चांगल्या गोष्टी केल्या की त्याचं बक्षीसही त्यांना लगेच मिळालं पाहिजे. बक्षीस म्हणजे कुठली महागडी वस्तूच त्यांना आणून दिली पाहिजे असं नाही किंबहुना तसं करूही नये. पण मुलांच्या चांगल्या वागणुकीबद्दल त्यांना शाबासकी देणं, त्यांचा पापा घेणं. प्रेमानं त्यांना मिठी मारणं, प्रोत्साहन म्हणून अगदी छोटीशी भेट कधीतरी देणं.. या गोष्टी मुलांसाठी जास्त प्रेरणादायी ठरतात.
४- मुलांच्या प्रत्येक गोष्टीत पालक म्हणून आपण इन्व्हॉल्व्ह असणं खूप महत्त्वाचं असतं. आपलं मूल शाळेतून आल्यावर त्याच्याजवळ बसून शाळेत आज काय काय झालं, तो काय शिकला हे त्याला विचारलं पाहिजे. आपण जे काही करतोय, त्यात आपल्या पालकांना रस आहे हे मुलांनाही कळलं पाहिजे. आपल्या मुलांचे मित्र कोण आहेत, कसे आहेत, घराबाहेर मुलगा काय करतो, यावर अगदी पाळत नाही ठेवली तरी आपलं मूल घरात आणि घराबाहेर काय करतं याकडे पालकांचं सकारात्मक लक्ष असलं पाहिजे.
अशा काही गोष्टी केल्या तर मुलांना नक्कीच चांगल्या सवयी लागू शकतील. काहींना हे कष्टाचं काम वाटत असेल, पण एकदा का तुम्ही मुलांमध्ये रमलात की या साºया गोष्टी आनंदाच्या होऊन जातात.

Web Title: How do children 'automatically' get good habits?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.