एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत नसेल तर कसा द्याल नकार...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 12:04 PM2020-01-07T12:04:18+5:302020-01-07T12:10:41+5:30
अनेकदा असं होत की आपल्याला नाही म्हणता येत नाही.
अनेकदा असं होत की आपल्याला नाही म्हणता येत नाही. आपण एखाद्या व्यक्तीच्या मनाचा विचार करून अनेकदा मनाविरूध्द गोष्टी करत असतो. पण काही काळापर्यंत हे ठिक असतं. पण हीच गोष्ट पुढे जाऊन तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. नातं कोणतंही असो अनेकदा त्या नात्याचं ओझं वाटतं असताना सुध्दा आपण ते नातं पुढे नेत असतो. तुम्हीसुध्दा जर अशाच परिस्थितीत अडकला असाल तर आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत ज्या टिप्सचा वापर करून तुम्ही जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीपासून दूर जायचं असेल तर कोणताही वाद न घालता समंजसपणे दूर जाऊ शकता.
(Image credit- gettyimages.com)
मला तुझ्यात इन्टेंस्ट नाही.
(image credit- travelio.com)
जर तुम्हाला एखादा मुलगा आवडत नसेल तर तुम्ही सरळ स्पष्ट शब्दात नकार द्या. त्याने तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवणं चुकिचं ठरेल. काहीवेळा एखादया मुलाबद्दल तुम्हाला त्या भावना वाटत नाहीत ज्या त्याला तुमच्याबद्दल वाटत असतात. अशा तो व्यक्ती तुम्हाला डेटवर जाण्यासाठी विचारणार मग तुम्ही त्यांना कारणं देणार, कामात व्यस्त असल्याच सांगून वेळ टाळणार. असं जर तुम्ही करत असाल तर त्याचा काही उपयोग नाही. कारण समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडून आशा अपेक्षा असतात. जर तुम्ही त्या पूर्ण केल्या नाहीत तर त्या व्यक्तीच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून सुरूवातीलाच तुमच्या मनाविरुध्द होत असेल तर स्पष्ट सांगा.
(image credit- your teen magazine)
अस्पष्ट बोलणे
(image credit-news standford.edu)
अनेकदा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला जर डेटवर जाण्यासाठी विचारले तेव्हा जर तुम्ही कन्फ्युज असाल तर त्या व्यक्तीला सरळ न बोलता अस्पष्ट उत्तर द्या. मला यायची इच्छा आहे पण मला येता येणार नाही. असं सांगा असं केल्यास त्या व्यक्तीला वाईट वाटणार नाही. तरी त्या व्यक्तीला तुम्ही फारसे इच्छुक नाही ते कळेल.
दुर्लक्ष करणे.
(image credit- the journal.ie)
जर तुम्हाला एखादा व्यक्ती आवडत नसेल तर तुम्ही त्याच्या वागणूकीकडे दुर्लक्ष करा. तसंच सोशल मिडियावर त्या व्यक्तीला अधिक वेळ न देणे. तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. जर त्या व्यक्तीची चूक झाल्यास सहजासहजी माफ करू नका. मग त्या व्यक्तीला कळून येईल की तुम्ही त्यांच्यापासून लांब जाण्यासाठी कारण शोधत आहात. तसंच त्या व्यक्तीला तुमच्यापासून जितकं लांब ठेवता येईल तितकं लांब ठेवा.
वास्तविकचेचं भान ठेवून बोलणे
(image credit- today.com)
वास्तवातील जीवनामध्ये येत असलेल्या समस्या समजावू घेऊन वागा. तर तुमच्या नात्यात तोचतोचपणा आला असेल आणि तुम्ही बोअर झाला असाल तर त्या व्यक्तीला स्पष्ट सांगा. भावनेच्या भरात विचार करू नका. तसंच तुमच्या पार्टनरकडे बोलायला काही विषय नसतील तर समजून जा की त्या व्यक्तीला तुमच्याशी बोलायचा कंटाळा आला आहे. समोरच्या व्यक्तीला रागाने आणि चिडून एखादी गोष्ट सांगण्यापेक्षा व्यवस्थित समजावून सांगा. असं केल्यास त्या व्यक्तीच्या मनात तुमची प्रतिमा खराब होणार नाही. तसंच तुमचे सगळे प्रश्न आणि अडचणी प्रेमाने बोलून सुटतील.