लग्नानंतर येतात या ५ मुख्य समस्या, पण समजूतदार असाल तर वाचाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 02:41 PM2018-12-11T14:41:15+5:302018-12-11T14:58:08+5:30
लग्नाबाबत नेहमीच असं म्हटलं जातं की, ये ऐसा लड्डू है जिसे खाने वाला भी पछताता है और नहीं खाने वाला भी पछताता है.
लग्नाबाबत नेहमीच असं म्हटलं जातं की, ये ऐसा लड्डू है जिसे खाने वाला भी पछताता है और नहीं खाने वाला भी पछताता है. म्हणजे लग्नानंतर जे नातं आपल्या समोर जे नातं असतं ते चांगलंही वाटतं आणि जेव्हा कुणी लग्न बंधंनात अडकतं तेव्हा स्थिती काही वेगळीच होते. कारण लग्नानंतरची स्थिती ही लग्नाच्या आधीसारखी नसते. आज आम्ही तुम्हाला लग्नानंतर होणाऱ्या बदलांबाबत सांगणार आहोत. हे बदल तुम्हाला स्विकारावेच लागतात आणि जर याचा स्विकार तुम्ही केला नाही तर तुमचंय वैवाहिक जीवन अडचणीत येऊ शकतं.
एकटेपणा दूर होणे
जर तुम्ही एकटे असाल तर लग्नानंतर तुमच्या आयुष्यातील हा एकटेपणा दूर होऊ शकतो. पण केवळ लग्न करणे हाच या समस्येचा उपाय नाहीये. जीवनात येणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांना दूर करण्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतात. म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की, लग्न केल्यावर तुमचा एकटेपणा दूर होतो तर तुम्ही चुकीचा विचार करताय. पण लग्नानंतर तुम्हाला असा एका साथीदार मिळतो, जो प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत असतो.
प्रायव्हसी हवीच
जवळपास सगळेच असं मानतात की, लग्न दोन व्यक्तींना जोडण्याचं काम करतं. पण लग्नानंतर सतत पार्टनरसोबत राहणं, कुठेही त्याला किंवा तिला एकटं जाऊ न देणं, स्वत:ही कुठे एकटं न जाणं, या सवयी चुकीच्या ठरु शकतात. सतत सोबत राहिल्याने दोघांमधील प्रेम वाढतं किंवा वाढेल असा विचार करणं चुकीचं आहे. कारण कधी कधी अशा वागण्याने समोरची व्यक्ती कंटाळू शकते. त्यामुळे लग्नानंतरही दोघांनीही एकमेकांच्या प्रायव्हसीला, स्वातंत्र्याला महत्त्व दिलं पाहिजे.
लग्नानंतर सगळंच बदलतं
लग्नानंतर काही दिवसांपर्यंत नवरा-नवरी दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळीच रंगत बघायला मिळते. पण लग्नाच्या काही महिन्यांची सर्वकाही बदलतं. दोघेही एकमेकांकडे लक्ष देणं कमी करतात. पण याचा अर्थ हा नाही की, समोरच्या व्यक्तीला आकर्षण राहिलं नाही. हे बदल होण्याचं कारण वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. या जबाबदाऱ्यांमुळे झालेला बदल स्विकारण्यात फायदा असतो. कारण चेहऱ्याची रंगतच सगळंकाही नसतं. दोघांनीही हा बदल स्विकारणे यातच शहाणपणा आहे.
वचने आणि प्रेम
(Image Credit : www.indiatvnews.com)
कस्मे वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या... हे गाणं सर्वांनीच ऐकलं असेल. लग्नादरम्यान वेगवेगळ्या शपथा दोघेही घेतात. प्रेम टिकवण्यासाठी दोघेही नको नको त्या गोष्टी ठरवतात. पण लग्नानंतर प्रेमाचं रुप बदलतं. प्रेम कमी होतं असं नाही पण त्यात बदल होतो. अशात या गोष्टीसाठी तयार रहा.
थोडं प्रेम, थोडा राग
लग्नाच्या काही वर्षांनी खूपकाही बदलेलं असतं. सुरुवातीला जे सगळं चांगलं चांगलं वाटतं, ते नंतर नसतं. लग्नाच्या काही महिन्यांनी दोघांमध्येही वेगवेगळ्या कारणांनी वाद होऊ लागतात. अनेकदा हे वाद इतके टोकाला जातात की, लग्नचं केलं नसतं तर बरं झालं असतं, असाही एक सूर ऐकायला मिळतो. पण लग्न झाल्यावर हे छोटे छोटे वाद होणारच. त्यामुळे अशावेळी दोघांनीही शांततेने आणि समजूतदारपणे वागवं. तेव्हाच तुमचं नातं चांगलं राहिल.