...म्हणून स्वतःपेक्षा कमी वयाच्या मुलीसोबत रिलेशनमध्ये असतात मुलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 04:36 PM2020-05-07T16:36:45+5:302020-05-07T16:45:56+5:30
मुलं आपल्यापेक्षा लहान असलेल्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये का असतात. याबाबत सांगणार आहोत.
सर्वाधिक रिलेशनशिपध्ये असलेल्या कपल्समध्ये मुलगा मोठा आणि मुलगी वयाने लहान असं चित्र दिसून येतं. सध्याच्या काळात समवयस्क पार्टनरसोबत लोक रिलेशनशिपमध्ये राहत असले तरी अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यातून तुम्हाला दिसून येईल की आपल्या वयापेक्षा लहान मुलीसोबत मुलं आयुष्यभर राहण्याचं ठरवतात.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा या गोष्टीला अपवाद नाहीत. आपल्यापेक्षा २४ वर्ष लहान असलेल्या मेलानिया सोबत ट्रम्प रिलेशनशिपमध्ये अजूनही आहेत. त्यांची लव्हस्टोरी १९८८ मध्ये सुरू झाली होती. त्यावेळी ट्रम्प ५२ वर्षाचे आणि मेलानिया २८ वर्षीय होती. आज आम्ही तुम्हाला मुलं आपल्यापेक्षा लहान असलेल्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये का असतात. याबाबत सांगणार आहोत.
जास्त इंटरफेअर करत नाहीत
एका रिसर्चमध्ये दिसून आलं की, कमी वयाच्या मुली कामात किंवा आयुष्यात जास्त इंटरफेअर करत नाही. जास्त वयाच्या महिलांना गरजेपेक्षा जास्त संशय घेणं, इंटरफेअर करणं अशा सवयी असतात. अनेकदा मोठ्या मुली बंधन घालत असतात. पार्टनर या गोष्टी जराही आवडत नाहीत. म्हणून कमी वयाच्या मुलींसोबत मुलं रिलेशनशिपमध्ये असतात.
लाईफस्टाईलकडे लक्ष असतं
कमी वयाच्या मुलींकडे आकर्षित होण्याचं कारण त्यांची लाईफस्टाईल हे सुद्धा असू शकतं. २५ ते ३५ या वयोगटातील मुली आपल्या राहणीमानाकडे, फिटनेसंकडे जास्त लक्ष होतात. तुलनेने जास्त वयाच्या महिला आपलं घर, मुलं यांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. सर्वाधिक पुरूषांची अशी तक्रार असते की त्यांच्या पार्टनर स्वतःकडे लक्ष देत नाहीत. म्हणून ते इतर मुलींकडे अट्रॅक होतात.
आत्मविश्वास असतो
कमी वयाच्या मुली खूपच सकारात्मक असतात. आपल्या पार्टनरला कामात नेहमी मदत करतात. आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्याची त्यांची इच्छा असते. याचा परिणाम त्यांचा लाईफस्टाईलवर सुद्धा होत असतो. जास्त वय असलेल्या महिला आपलं घर मुलं यामध्ये इतक्या बिझी असतात की त्यांना आपल्या पार्टनरकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. (हे पण वाचा-नातं तुटायला मुलांच्या 'या' सवयी ठरतात कारणीभूत)
ताण- तणाव आणि एकटेपणापासून दूर राहता येतं
वाढत्या वयात व्यक्तीच्या जीवनात ताणतणाव आणि एकटेपणा वाढत जातो. अशावेळी जर पार्टनर लहान असेल तर पार्टीस, क्लब यांचा आनंद मोकळेपणाने घेता येतो. शिवाय पार्टनर वयाने लहान असेल तर लैगिंक जीवनात सुद्धा पुरूषांना संतुष्टी मिळत असल्याचं रिसर्चमध्ये दिसून आलं आहे. कमी वयाच्या मुली आपल्या पार्टनरवर जास्त प्रेम करतात. या कारणांमुळे मुलांना आपल्या वयापेक्षा लहान असलेल्या मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये ठेवायचं असतं. ( हे पण वाचा-'या' राशीच्या मुली असतात सगळ्यात जास्त संशयी; पार्टनरवर जराही नसतो विश्वास )