लग्नानंतर पार्टनरला आणि घरच्यांना कसं कराल हॅन्डल, वाचा 'या' खास टीप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 03:36 PM2020-01-21T15:36:29+5:302020-01-21T15:48:21+5:30

कोणत्याही मुलाचं अथवा मुलीचं लग्न झाल्यानंतर आयुष्यच बदलून जात असतं.  

How to Handle Partners and family After Marriage | लग्नानंतर पार्टनरला आणि घरच्यांना कसं कराल हॅन्डल, वाचा 'या' खास टीप्स

लग्नानंतर पार्टनरला आणि घरच्यांना कसं कराल हॅन्डल, वाचा 'या' खास टीप्स

Next

कोणत्याही मुलाचं अथवा मुलीचं लग्न झाल्यानंतर आयुष्यच बदलून जात असतं.  अनेकदा आपल्याला नवीन घरात गेल्यानंतर एडज्टमेंटचा सामना करावा लागतो. आपल्या पार्टनरला समजून घेण्यासोबतच त्याच्या घरच्यांना सुद्धा समजून घ्यावं  लागतं. तर काही वेळा आपली इच्छा नसेल तरी त्यांच्या मनासारखं वागवं लागत असतं.

Image result for newly married

लग्न होऊन सासरच्या घरी गेल्यानंतर मुलींना साधारणपणे आपली पाककला म्हणजेच वेगवेगळे चविष्ट पदार्थ तयार करून नवरा आपल्या नव्या कुटूंबाचं मन जिंकायचं असतं. त्यात पण जर काही पदार्थ मुलीने तयार केला तर 'आमच्याकडे अशीच फोडणी देतात, अश्याच पध्दतीने पदार्थ करतात, साखरेचं प्रमाण इतकंच असावं'. अश्याप्रकारचे डायलॉग्स सुरूवातीच्या काळाच  मुलींना ऐकून घ्यावे लागतात.

Image result for newly married

सध्याच्या काळात मुली कितीही ऑफिसवर्क किंवा कामाला जात असल्या तरी घरची जबाबदारी तर सांभाळावीच लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टीप्स सांगणार आहोत.  ज्या टीप्स तुम्हाला जर तुमचं लग्न नुकतच झालं असेल तर नक्की उपयोगी पडतील. 

Related image
समजून घेण्याचा प्रयत्न करा

Image result for married couples

जर तुम्ही तुमच्या सासरच्या कु़टूंबाला चुकिचं समजत असाल तर  तुम्ही मोठी चुक करत आहात.जर तुमच्याशी कोणी वरच्या आवाजात किंवा रागात बोलले तर तुम्ही आधी त्या व्यक्तीची मनस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा.  अनेकदा असं होऊ शकतं की समोरच्या जे सांगायच आहे ते न समजता तुम्ही भलतचं काही गैरसमज करून घेतला असेल. कारण काहीजण स्वाभाविकपणे रागीष्ट असतात नवीनच लग्न झालं असल्यामुळ कोणाशीही बोलत असताना  नम्रपणे बोलण्याचा प्रयत्न करा. 

सासरच्या कुटूंबाला माहेरच्या कुटूंबासारखं समजा

Related image(image credit0 kentlive news)

जर तुमच्या सासूला तुमच्या वागण्यामुळे नेहमी प्रोब्लेमच होत असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत अधिकवेळ घालवा . आणि त्यांना काय आवडत आणि काय नाही आवडत हे समजून घेण्याचा प्रयत्न करा.  त्यांचा स्वभाव कसा आहे.  हे ओळखा. मग त्यांच्या आवडीचे पदार्थ तयार करून मन जिंकण्याचा प्रयत्न करा. मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी.

वाद टाळण्याचा प्रयत्न करा

Related image

कोणत्याही जोडप्यामध्ये वाद होतातच पण घरच्यांचा हस्तक्षेप असेल तेव्हा   त्यांचात सुद्धा वाद होत असतात. पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत.  जर भांडणं होत असतील तुम्हालाच त्रास होऊन तुमची मानसीक स्थिती बिघडू शकते. त्यामुळे  समजदारीने वागण्याचा प्रयत्न करा. 

Web Title: How to Handle Partners and family After Marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.