लॉकडाऊनमध्ये पार्टनर सतत चिडचिड करत असेल, तर 'या' टिप्स तुमच्यासाठीच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 05:33 PM2020-04-19T17:33:22+5:302020-04-19T17:42:22+5:30

तुमच्याघरी सुद्धा एखादा शॉर्ट टेंपर्ड व्यक्ती असेल म्हणजेच त्याला सतत राग येत असेल. तर परिस्थिती कशी  हाताळायची याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

How to keep cool yourself with short tempered person myb | लॉकडाऊनमध्ये पार्टनर सतत चिडचिड करत असेल, तर 'या' टिप्स तुमच्यासाठीच

लॉकडाऊनमध्ये पार्टनर सतत चिडचिड करत असेल, तर 'या' टिप्स तुमच्यासाठीच

googlenewsNext

(Image credit- The good man project)

सध्या कोरोना व्हायरसमुळे भारतात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे घरी राहण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. अशात बंद खोलीत असल्यामुळे पार्टनरसोबत सतत भांडणं होत असतात. कारण २४ तास त्याच व्यक्तीसोबत राहिल्यामुळे वाद होण्याची शक्यता असते.

तुमच्याघरी सुद्धा एखादा शॉर्ट टेंपर्ड व्यक्ती असेल म्हणजेच त्याला सतत राग येत असेल. तर परिस्थिती कशी हाताळायची याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कारण एखाद्या सतत चिडत असेलल्या व्यक्तीला उलट बोलल्यानंतर वाद वाढण्याची शक्यता असते. म्हणून आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत

रागाचं कारण शोधून काढा

तुम्ही ज्या व्यक्तीसोबत राहत आहात ती व्यक्ती अपसेट असेल, आणि त्याच वेळेला तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करत असाल तर सगळा राग तुमच्यावर निघू शकतो. म्हणून आधी समोरच्या व्यक्तीच्या मानसिकतेला समजून घ्या.  सतत घरी बसून मूड खराब होणं, किंवा बोअर होण्याची शक्यता असते म्हणून बोलण्याआधी समोरच्या व्यक्तीचा प्रोब्लेम समजून घ्या.

रिएक्ट करू नका

असं म्हणतात की दोन व्यक्ती जेव्हा एकाचवेळी रागावतात तेव्हा भांडण होऊन नात्यात दुरावा येतो. यासाठी जर एका व्यक्तीला राग आला असेल तर इतर व्यक्तीनीं शांत राहणं गरजेचं आहे. परिस्थितीचे गांभीर्य ठेवून दोघांमधील एकाने शांत रहायला हवं. जेव्हा पार्टनरचा राग शांत होईल त्यावेळी तुम्ही संवाद साधा.

समोरच्या व्यक्तीला स्पेस द्या

अनेकदा तुम्ही चिडचिड करत असलेल्या व्यक्तीला शांत होण्यासाठी समजावून सांगत असता. यामुळे अनेकदा मानसिक त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून अशा व्यक्तीला एकटं सोडून द्या. मुड चेन्ज झाल्यानंतर ती व्यक्ती आपोआप शांतेतेने बोलण्याचा प्रयत्न करेल.

पेशंन्स ठेवा

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे तुम्हाला २४ तास घरी राहायचं आहे. अनेकदा एकमेकांचा राग सुद्धा सहन करावा लागेल. म्हणून समोरच्या व्यक्तीने एखाद्यावेळी तुमचा राग केला तरी शांत राहण्याचा प्रयत्न करा. जेव्हा पार्टनरला आपली चूक कळेल तेव्हा आपणहून ती व्यक्ती सॉरी म्हणेल. पार्टनरला नोकरी, घरातील जबाबदारी यापैकी कुठल्याही गोष्टींचं टेशन आल्यास समजून घ्या. चर्चा करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. मानसिक आधार देण्याचं काम करा.

Web Title: How to keep cool yourself with short tempered person myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.