मुली फ्लर्ट करत असतील तर, 'या' सिक्रेट टिप्सनी ओळखा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 01:57 PM2020-03-18T13:57:48+5:302020-03-18T14:09:07+5:30
अनेकदा मुलांना मुली त्यांना लाईक करत असतात किंवा त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतात पण मुलींना कळत नाही.
सध्याच्या काळात मुलचं नाही तर मुलीसुद्धा फ्लर्टिंगच्या बाबतीत मुलांना मागे टाकतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत. ज्यावरूनु तुम्हाला कळेल की एखादी मुलगी तुमच्याशी फ्लर्ट करतेय का. कारण अनेकदा मुलांना मुली त्यांना लाईक करत असतात किंवा त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतात पण मुलांना कळत नाही.
जास्त इमोशनल होणं
जर एखादी मुलगी तुम्हाला आपलं समजून तिच्या आयुष्यात घडत असलेल्या सगळ्याच गोष्टी सांगत असेल किंवा जास्त भावनीक होत असेल त्या मुलीला तुम्ही खूप आवडत असता.
इशारे
जर तुमचे एखाद्या मुलीसोबतचं बोलणं हावभावावरून किंवा नजरेतून होत असेल तर तुम्ही त्या मुलीला खूप आपलं समजत असता. न बोलताच अनेक गोष्टी मुलींना हावभावातून कळायला लागलेल्या असतात. याचा अर्थ त्या मुलीला तुम्ही खूप आवडता.
ड्रेसिंग
मुलगी तुम्हाला लाईक करत असेल तर तुम्हाला इंप्रेस करायची एकही संधी सोडत नाही. कारण त्यावेळी त्या मुलीला कोणतीही रिस्क घ्यायची नसते. जर तुमच्या समोर ड्रेसिंग करून आणि आपले कपडे व्यवस्थित करत एखादी मुलही येत असेल तर ती नक्कीच तुम्हाला लाईक करते. तसंच जर एखादी मुलगी तुम्हाला लाईक करत असेल तर पटकन सांगायला ऑकवर्ड फिल करते. तुम्हाला तुमच्या निक नेमने बोलावते. तुमच्या राहणीमानावर आणि प्रत्येक बारीकसारीक गोष्टीकडे तिचं लक्ष असतं.( हे पण वाचा-इंटरकल्चर रिलेशनशिपमधील समस्यांना 'या' सोप्या उपायांना करा हॅण्डल)
करू नका ही चूक
जर एखादी मुलगी तुमच्याशी फ्लर्ट करत आहे. हे तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मर्यादा लक्षात ठेवणं फार गरजेचं असतं. कारण ती मुलगी तुम्हाला खूप जवळचं समजत असते. हसण्यातून किंवा बोलण्यातून तुम्ही त्या मुलीला हर्ट करता कामा नये. कारण तुम्ही जास्त टची होत असाल तर याच सवयीमुळे तुमच्यापासून लांब जाण्याची शक्यता असते. म्हणून समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करा. (हे पण वाचा-गर्लफ्रेंडच्या 'या' सवयींमुळे वैतागतात मुलं, मुलींना सहन करणंही होतं कठीण)