ती आपल्याशी फ्लर्ट करतेय का? 'हे' संकेत नक्की देतील उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 03:30 PM2020-03-03T15:30:18+5:302020-03-03T15:51:43+5:30
(image credit- love panky) जेव्हा कोणताही मुलगा मुलीला लाईक करत असेल तर तो मुलगा मुलीला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करत ...
(image credit- love panky)
जेव्हा कोणताही मुलगा मुलीला लाईक करत असेल तर तो मुलगा मुलीला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो. काही असे संकेत असतात.ज्याद्वारे मुलीपर्यंत तुमच्या मनातली गोष्ट कळलेली असते. तेव्हा तुम्हाला त्या मुलीचे फ्लर्टिंग स्किल पहायला मिळतील. असं अजिबात नाही की फक्त मुलचं फ्लर्ट करतात. याबाबतीत मुली सुद्धा काही कमी नाही.
जर मुली कुठल्या मुलाला लाईक करत असतील तर त्या आपल्या हावभावांनी आणि वागणूकीवरून दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. मुली असे संकेत देत असतात त्यावरून कळून येत की मुली तुम्हाला लाईक करतात. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत अशी लक्षणं.
(tenor)
जवळ येणे
(image credit- giphy)
जर एखादी मुलगी तुम्हाला लाईक करत असेल तर ती बोलण्यासाठी किंवा कोणत्याही कामाचं निमित्त काढून सतत जवळ येण्याचा प्रयत्न करत असते. असं तुमच्या बाबतीत होत असेल तर ती मुलगी तुम्हाला लाईक करत आहे.
केस व्यवस्थित करणे
(image credit- El crema)
जर एखादी मुलगी तुम्हाला पाहून सतत आपले केस व्यवस्थित करत असेल किंवा केसांवर हात फिरवत असेल तर तुम्ही त्या मुलीला खूपचं अट्रॅकटिव्ह वाटत असता. याचा अर्थ असा की त्या मुलीला तुमच्याशी बोलण्यात खूप रस आहे.
डोळ्यांनी बोलणे
(image credit- gif)
जेव्हा एखादी मुलगी फ्लर्ट करत असेल तेव्हा तीचे डोळे खूप काही सागून जाणारे असतात. जर बोलता बोलता ती मुलगी नजर खाली टाकत असेल तर या गोष्टींचे संकेत आहे की तुमच्या मनात तिच्याबद्दल खूप प्रेम आहे.
हास्य लपवलं जात नाही
(image credit- pinterest)
जर एखादी मुलगी मुलाला लाईक करत असेल तर तो मुलगा समोर आल्यानंतर हसू लपवता येत नाही. तिच्या हसण्यात अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील.
आपले कपडे व्यवस्थित करणं
(image credit-giphY)
जर एखादी मुलगी तुम्हाला लाईक करत असेल तर तुम्हाला इंप्रेस करायची एकही संधी सोडत नाही. कारण त्यावेळी त्या मुलीला कोणतीही रिस्क घ्यायची नसते. जर तुमच्या समोर ड्रेसिंग करून आणि आपले कपडे व्यवस्थित करत एखादी मुलही येत असेल तर ती नक्कीच तुम्हाला लाईक करते. ( हे पण वाचा-मुलांना कमी उंची असलेल्या मुलींना मिठी मारायला का आवडतं ? जाणून घ्या कारणं)
(image credit- Gfycat)
मुली या फ्लर्ट करण्यामध्ये एक्सपर्ट असतात. जर तुमच्याशी बोलताना स्पर्श करून अथवा आवाजात बदल करून तुम्हाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असेल तर ती मुलगी तुमच्यासोबत फ्लर्टिंग करत आहे असं समजा. दैनंदिन आयुष्यात ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये असे अनुभव अनेकदा येत असतात. तेव्हा जर एखादी मुलगी तुम्हाला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करत असेल तर या संकेतानी तुम्ही नक्की ओळखू शकता. ( हे पण वाचा-मुलींना इंप्रेस करायचं असेल तर कॉम्पलिमेंट देताना 'या' गोष्टी माहित असायलाच हव्यात)