नात्यामध्ये गोडवा टिकवण्यासाठी एकमेकांची प्रायव्हसी जपणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 08:00 PM2019-04-19T20:00:05+5:302019-04-19T20:01:14+5:30

एका उत्तम रिलेशनशिपसाठी जेवढं एकमेकांसोबत सर्व गोष्टी शेअर करणं गरजेचं आहे, तेवढचं एकमेकांची प्रायव्हसीही लक्षात घेणं गरजेचं आहे.

How much privacy in a relationship is ok | नात्यामध्ये गोडवा टिकवण्यासाठी एकमेकांची प्रायव्हसी जपणे गरजेचे

नात्यामध्ये गोडवा टिकवण्यासाठी एकमेकांची प्रायव्हसी जपणे गरजेचे

Next

एका उत्तम रिलेशनशिपसाठी जेवढं एकमेकांसोबत सर्व गोष्टी शेअर करणं गरजेचं आहे, तेवढचं एकमेकांची प्रायव्हसीही लक्षात घेणं गरजेचं आहे. नात्यानुसार, प्रायव्हसचा अर्थही बदलतो. खासकरून तेव्हा जेव्हा आपण रोमॅन्टिक रिलेशनशिपमध्ये असतो. अनेक लोकांचं नेचर असं असतं की, ते प्रत्येक गोष्ट शेअर करताना अनकम्फर्टेबल असतात. याचाच अर्थ असा नाही की, तुम्ही दोघांमध्ये प्रेम कमी आहे. तुम्हाला पार्टनरचं हे नेचर, त्यंचा स्वभाव लक्षात घेणं गरजेचं आहे. 

तुम्हाला असं वाटत असेल की, या मुद्द्यावरून तुमच्या नात्यामध्ये कोणताही दुरावा येऊ नये, तर दोघांना एकत्र बसून आपल्या लिमिट्सबाबत एकमेकांशी बोलणं गरजेचं असतं. नात्यामध्ये विश्वास असणं अत्यंत गरजेचं असतं. जर तुम्हाला तुमच्या पार्टनरवर विश्वास असेल आणि तुमच्या नात्यामध्ये तुम्ही एकमेकांशी सहमत असाल तर तुम्हाला पार्टनरच्या पर्सनल स्पेसमुळे काहीही त्रास होणार नाही. 

तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत आयुष्यभरासाठी राहण्याचा विचार करत असाल तर असं गरजेचं नाही की, त्यांनी प्रत्येक छोटी-छोटी गोष्ट तुमच्याशी शेयर करावी. 

असं ठरवा तुमचे लिमिट्स 

जर तुम्हाला हे समजत नसेल की, तुमच्या पार्टनरला किती प्रायव्हसी द्यावी तर तुम्ही त्यांच्यासोबत या विषयावर बोलू शकता. कोणत्याही विषयावर बोलताना ते कंफर्टेबल नसतील तर त्यांना जबरदस्ती करू नका. असं केल्याने त्यांच्या मनात तुमच्याविषयीचा आदर आणखी वाढेल. 

अनेकदा लोक आपल्या पार्टनरबाबत जास्तीत जास्त माहिती करून घेण्यासाठी त्यांना खूप प्रश्न विचारतात. जर त्यांना त्यांच्या प्रश्नांची पूर्ण उत्तरं मिळाली नाही तर ते निराश होतात. तसेच दुसरीकडे तुमचा पार्टनर सर्व गोष्टी शेअर करण्यासाठी उत्सुक नसेल तर त्यांना तुमच्या प्रश्न विचारण्याचा त्रास होतो. यामुळे नातं बिघडू शकतं. 

अनेक प्रकरणं अशीही असतात, जिथे तुमचा पार्टनर जुन्या नात्यामध्ये विश्वासघात झाल्यामुळे  प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर तुम्हाला याबाबत मोकळेपणाने त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे. 

दरम्यान प्रायव्हसीच्या नावावर तुम्ही त्यांच्यापासून प्रत्येक गोष्ट लपवणं हे नात्यामध्ये दुरावा आणू शकतं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. 

Web Title: How much privacy in a relationship is ok

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.