या मुलांना ‘शिकवायचं’ तरी कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:59 PM2017-09-21T12:59:49+5:302017-09-21T13:01:04+5:30

संयम आणि चिकाटीबरोबर पालकांकडे या गोष्टही हव्यात..

How to 'teach' these children? | या मुलांना ‘शिकवायचं’ तरी कसं?

या मुलांना ‘शिकवायचं’ तरी कसं?

Next
ठळक मुद्देमुलांचे प्रश्न कोणतेही असोत, योग्य ती उत्तरं मुलांना मिळायलाच हवीत.दृष्य प्रतिमा, गोष्टी.. यासारख्या माध्यमांतून जर मुलांना काही गोष्टी समजावता आल्या तर मुलांच्या मनावर त्या लवकर ठसतात आणि त्या त्यांच्या लक्षातही राहतात.लक्ष एकाग्र करता येऊ शकतील अशा गोष्टींचा चातुर्यानं वापर केला तर मुलांचा अटेन्शन स्पॅन वाढू शकतो.कोणतीही गोष्ट घाईघाईनं शिकवण्यापेक्षा सोप्याकडून अवघडकडे असाच प्रवास असला पाहिजे. काठिण्यपातळी हळूहळू वाढवत नेली पाहिजे.

- मयूर पठाडे

आपल्या मुलांशी आपण कसं बोलतो? कायम वसावसा त्यांच्या अंगावर ओरडत असतो कि त्यांच्याशी प्रेमानं, त्यांना समजून घेऊन त्यांच्याशी संवाद साधत असतो? मुलांची आकलनक्षमता उत्तम असेल तर एकवेळ ठीक, पण मुलांचा आयक्यू जर कमी असेल, सर्वसाधारण मुलांपेक्षा त्यांची शिकण्याची गती कमी असेल, तर या मुलांसाठी असं वागणं फारच धोक्याचं ठरू शकतं. कारण त्यांची शिकण्याची क्षमता, इच्छा आणखीच कमी होऊ शकते.
मुलांशी कायम त्याच भाषेत बोललं पाहिजे, जी त्यांना समजेल. यावर काही जण असंही म्हणतील, आजकालच्या पोरांना माराचीच भाषा समजते, त्याशिवाय ते वठणीवर येत नाहीत, पण धाकदपटशा कधीच कामाला येत नाही आणि त्याचा फारसा उपयोगही होत नाही. त्या वेळेपुरता कदाचित त्याचा ‘सकारात्मक’ परिणाम दिसू शकेल, पण अंतिमत: मुलांसाठी आणि पालकांसाठीही ते घातकच आहे, असा इशारा संशोधकांनी, अभ्यसकांनीही देऊन ठेवलाय.
मुलांचे कोणतेही प्रश्न असोत, ते अगदीच किरकोळ असोत किंवा अवघड, आपल्यालाही न समजणारे.. ते टाळण्यापेक्षा त्यांची योग्य ती उत्तरं मुलांपर्यंतं पोहोचवणं मुलांच्या भवितव्यासाठी फारच उपयुक्त असतात. योग्य ती उत्तरं मुलांना मिळायलाच हवीत.
दृष्य प्रतिमा, गोष्टी.. यासारख्या माध्यमांतून जर मुलांना काही गोष्टी समजावता आल्या तर मुलांच्या मनावर त्या लवकर ठसतात आणि त्या त्यांच्या लक्षातही राहतात.
मुलांचा, त्यातही लहान मुलांचा आणि ही मुलं जर सर्वसाधारण मुलांपेक्षा कमी आयक्यू असलेली असतील, तर त्यांचा अटेन्शन स्पॅन, म्हणजे लक्ष एकाग्र करण्याची क्षमता खूपच कमी असते. त्यासाठी त्यांचे लक्ष एकाग्र करता येऊ शकतील अशा गोष्टींचा चातुर्यानं वापर केला तर त्यांचा अटेन्शन स्पॅनही वाढू शकतो.
कोणतीही गोष्ट घाईघाईनं शिकवण्यापेक्षा सोप्याकडून अवघडकडे असाच प्रवास असला पाहिजे. काठिण्यपातळी हळूहळू वाढवत नेली पाहिजे.
ज्यांची शैक्षणिक गती कमी आहे, ज्यांचा कमी आयक्यू आहे, अशा मुलांना बºयाचदा आपल्या बुटाच्या नाड्याही व्यवस्थित बांधता येत नाहीत. पण त्यावर चिडण्यापेक्षा त्यांची ही क्षमता विकसित करून मग तुलनेनं अधिक गोष्टी शिकवण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यासाठी संयम हवा आणि चिकाटीही. त्याला पर्याय नाही.

Web Title: How to 'teach' these children?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.