पत्नी किंवा गर्लफ्रेन्डला आनंदी ठेवण्याची खास ट्रिक, तुम्हालाही नसेल माहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 02:45 PM2023-07-19T14:45:38+5:302023-07-19T14:49:16+5:30

Relationship : पत्नीला किंवा गर्लफ्रेंन्ड खूश ठेवण्यात तुम्ही तारांबळ उडत असेल तर हा फंडा पडू शकतो तुमच्या कामात.

How to keep girlfriend or wife happy? Know the scientific way | पत्नी किंवा गर्लफ्रेन्डला आनंदी ठेवण्याची खास ट्रिक, तुम्हालाही नसेल माहीत!

पत्नी किंवा गर्लफ्रेन्डला आनंदी ठेवण्याची खास ट्रिक, तुम्हालाही नसेल माहीत!

googlenewsNext

Relationship : पत्नीला किंवा गर्लफ्रेंन्ड आनंदी कसं ठेवायचं हा अनेकांसमोर मोठा प्रश्न असतो. पण ही समस्या असणाऱ्या लोकांसाठी एक दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. हा प्रश्न मार्गी कसा लावायचा या सायन्टिफिक फंडा समोर आला आहे. एक रिसर्चमध्ये याकडे इशारा करण्यात आला आहे की, गर्लफ्रेन्ड किंवा पत्नीला खूश करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे empathise म्हणजेच सहानुभूती दाखवणे.

काय सांगतो रिसर्च?

अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनकडून हा रिसर्च करण्यात आला होता. या रिसर्चमध्ये अभ्यासकांनी १५६ हेट्रोसेक्शुअल कपल्सचा अभ्यास केला, जे वेगवेगळ्या इकॉनॉमिक बॅकग्राउंडचे होते. हे कपल्स कमिटेड रिलेशनशिपमध्ये होते आणि गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून एकमेकांसोबत होते. 

या रिसर्चचा उद्देश हे जाणून घेणं होतं की, महिला आणि पुरूष सहानुभूतीला किती महत्त्व देतात. सर्वच सहभागी लोकांना काही व्हिडीओ दाखवले गेले आणि विचारलं गेलं की, त्यांना कसं वाटलं? त्यांच्या पार्टनरला कसं वाटत होतं आणि त्यांना समजून घेण्यात त्यांचे पार्टनर्स किती मेहनत घेत होते.

पार्टनरने काय करावं?

या रिसर्चमध्ये महिला आणि पुरूष दोघांचं हेच मत होतं की, जेव्हा त्यांचे पार्टनर त्यांना समजून घेण्यासाठी जास्त एफर्ट्स लावतात तेव्हा त्यांना चांगलं वाटतं. या गोष्टीला महिलांनी जास्त महत्त्व दिलं.

अभ्यासकांनुसार, महिला त्यांच्या पार्टनरना सहानुभूची दाखवण्यासाठी जास्त मेहनत घेण्याला महत्त्व देतात. कारण हा याचा संकेत आहे की, तुमचा पार्टनर रिलेशनशिपबाबत सतर्क आहे आणि त्यांना इमोशनली जवळीकता जाणवते.  

Web Title: How to keep girlfriend or wife happy? Know the scientific way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.