पार्टनरच्या आयुष्यात तुमच्याशिवाय अजून कोणी असेल तर कसं ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 04:05 PM2020-01-25T16:05:49+5:302020-01-25T16:21:34+5:30

रिलेशनशीपमध्ये असताना किंवा लग्न झालेलं असताना सुद्धा जेव्हा दोघाच्यामध्ये तिसरा व्यक्ती येतो.

How will you identify the if your partner doing extra marital affair | पार्टनरच्या आयुष्यात तुमच्याशिवाय अजून कोणी असेल तर कसं ओळखाल?

पार्टनरच्या आयुष्यात तुमच्याशिवाय अजून कोणी असेल तर कसं ओळखाल?

Next

(image credit- primetweet.com.ng)

रिलेशनशीपमध्ये असताना किंवा लग्न झालेलं असताना सुद्धा जेव्हा दोघांच्यामध्ये तिसरा व्यक्ती येतो तेव्हा अनेकदा  पार्टनर पासून लपवून ठेवलं जातं. अर्थात प्रत्येक  पुरूष किंवा महिलेने असं करण्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. नात्यांमध्ये संशय नावाचा विचित्र प्रकार असतो. तो काही वेळेला खरा सुद्धा ठरत असतो. अनेक महिलांना असं वाटत असतं की आपल्या पतीचे आपल्यावर खूप प्रेम आहे किंवा आपला पती आपल्याशी एकनिष्ठ आहे. पण पत्नीवर प्रेम असताना देखील काहीवेळा इतर  महिेलेसोबत अफेअर असू शकतं.  जर तुम्हाला सुद्धा  असं वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्या पार्टनरचं अफेअर आहे की नाही.

Image result for extramarital(Image credit-corish and co)

रिलेशनशीपमध्ये असलेल्या लोकांच्या वागण्यात जर बदल दिसून येत असेल तर त्यांचे अफेअर असू शकते. जर तुम्हाला असं वाटत असेल  की पार्टनरचं तुमच्याकडे लक्ष नाही. तर तुम्ही पार्टनरला क्रॉस चेक  करू शकता.  कारण तुमच्यापासून दूर जाण्याचं किंवा तुमच्याकडे लक्ष न देण्याचं कारण पार्टनरच्या आयुष्यात असलेला दुसरा व्यक्ती सुद्धा असू शकतो.  ( हे पण वाचा- तुमचा बॉयफ्रेंड अजूनही एक्स गर्लफ्रेंडशी बोलतो का हे कसं ओळखाल?)

Image result for extramarital(image credit-shesaid.com)

ऑफिसची किंवा कामाची वेळ संपल्यानंतर सुद्धा जर तुमचा पार्टनर लवकर घरी येत नसेल. सतत उशीरा येत असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरवर शंका घेऊ शकता. याशिवाय तुमचा पार्टनर जर घरी आल्यानंतर वेळ देत नसेल किंवा तुमच्याशी उद्धटपणे बोलत असेल तर याचा अर्थ असा होतो की पार्टनरचं तुमच्याकडे लक्ष नाही. घरी असताना सुद्धा जर तुमचा पार्टनर सतत फोनवर बोलत असेल  किंवा चॅटिंग चालू असेल तर  यामुळे तुमच्यात भांडण सुद्धा होऊ शकतात. पण अनेक घरांमध्ये पुरूष तासंनतास मोबाईलचा वापर करत असतात. पण पार्टनरला काहीही आक्षेप नसतो. 

Image result for extramarital

पण जर तुमच्या पार्टनरचं बाहेर अफेअर असेल तर नातं तोडण्यासारखं यात काही नाही. असं सुद्धा असू शकतं की तुमचा पार्टनर काही  समस्यांमधून जात असेल. अशावेळी तुम्ही आपल्या पार्टनर सोबत बसून चर्चा करणं आवश्यक आहे. फक्त संशय आल्यानंतर तुम्ही कोणतीही मोठा निर्णय तडकाफडकी घेणे हे योग्य नाही. एका चांगल्या नात्यात मुलगा आणि मुलगी दोघांनीही आपलं नातं जपण्यासाठी काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे कारण नसताना संशय घेणं तुमच्या नात्यासाठी योग्य ठरणार नाही. ( हे पण वाचा - लग्नानंतर सुद्धा एक्सची आठवण येते? तर 'हा' फंडा वापरून नेहमी खूश रहा.)

Web Title: How will you identify the if your partner doing extra marital affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.