ऑफिसमध्ये एक्ससोबत सतत आमनासामना होतो? अशी सांभाळा इमेज!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 02:48 PM2018-09-08T14:48:53+5:302018-09-08T14:52:34+5:30
जर तुमची एक्स तुमच्या ऑफिसमध्येच काम करत असेल आणि सतत तिला समोरं जावं लागत असेल तर अशावेळी व्यवस्थित काम करणं किंवा वागणं जरा कठीण असतं.
प्रोफेशनल लाइफमध्ये तुमचं वागणं आणि तुमची इमेज खूप महत्त्वाची असते. अनेकदा ऑफिसमध्ये काही वाद झाल्यावर अशी परिस्थिती कशी हाताळायची याचाही विचार करावा लागतो. जर तुमची एक्स तुमच्या ऑफिसमध्येच काम करत असेल आणि सतत तिला समोरं जावं लागत असेल तर अशावेळी व्यवस्थित काम करणं किंवा वागणं जरा कठीण असतं. अशावेळी ऑफिसमधील तुमचं नेमकं काय सुरु आहे यावरही लक्ष ठेवून असतात. त्यामुळे अशी परिस्थिती कशी हाताळायची याच्या काही खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
वागणूक नॉर्मल ठेवा
ऑफिसमध्ये जर तुम्हाला आपल्या एक्सला सतत फेस करावं लागत असेल, तर तुमचं वागणं सामान्य ठेवा. कोणत्याही प्रकारची ओव्हर रिअॅक्शन तुमची इमेच खराब करु शकते. अशावेळी स्वत:वर कंट्रोल ठेवणे कठीण असते, पण प्रयत्न केला तर सगळं ठिक होतं.
खाजगी जीवन शेअर करु नका
आपल्या एक्ससोबत काम करत असताना जर तुम्ही केवळ कामासंबंधीच बोलला तर जास्त बरं राहिल. तुम्ही तुमच्या पर्सनल गोष्टी एक्ससोबत शेअर करण्याचा प्रयत्न करु नका. असे केल्याने स्थिती आणखी बिघडू शकते. जर कुणी तुमच्याशी जुन्या गोष्टींवरु बोलण्यास सुरुवात करत असेल तर तुम्ही विषय बदलवू शकता.
जुन्या गोष्टी गंमतीत टाळा
अनेकदा असं होतं की, तुम्ही तुमच्या एक्ससोबत एकटे किंवा ग्रुपमध्ये बसले असता आणि अशात कुणीतरी जुन्या गोष्टीवरुन काहीतरी गंमत करतं. या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करुन ती गोष्ट हसण्यावर सोडू शकता. कोणत्याही प्रकारे विषय वाढेल असं काही बोलू नका.
खाजगी ते खाजगीच राहू द्या
ऑफिसमध्ये काम करता करता काही लोक आपल्या पर्सनल गोष्टीही शेअर करु लागतात. अशावेळी तुमची एक्सही ऑफिसमध्ये असेल तर ही चूक अजिबात करु नका. तुमच्या जुन्या नात्याबाबत ऑफिसमध्ये कुणाशीही काही बोलू नका. जर त्या नात्याबाबत तुम्ही काही विषय काढला तर त्यावरुन ऑफिसमध्ये तुमची खिल्लीही उडवली जाऊ शकते.
भावनांवर कंट्रोल ठेवा
असेही होऊ शकते की ऑफिसमध्ये काम करता करता अचानक एक्ससोबत घालवलेल्या खास आठवणी आठवतील. अशावेळी स्वत:ला सांभाळणे गरजेचे आहे. आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवा आणि कुणाही समोर स्वत:ला कमजोर पडू देऊ नका.