लहान मुलांना मोबाइलपासून दूर कसं ठेवायचा प्रश्न पडला असेल तर 'या' आईकडून शिका!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 12:28 PM2019-11-13T12:28:20+5:302019-11-13T12:28:41+5:30
आजच्या लहान मुलांचं सर्वात आवडतं खेळणं म्हणजे मोबाइल फोन. प्रत्येकालाच मोबाइल हवा असतो. पण सतत मोबाइल खेळण्याचे अनेक दुष्परिणामही बघायला मिळतात.
(Image Credit : studyinternational.com)
आजच्या लहान मुलांचं सर्वात आवडतं खेळणं म्हणजे मोबाइल फोन. प्रत्येकालाच मोबाइल हवा असतो. पण सतत मोबाइल खेळण्याचे अनेक दुष्परिणामही बघायला मिळतात. पण लहान मुलं रडायला लागले की, आई-वडील त्यांना गप्प करण्यासाठी पुन्हा मोबाइल देतात. लहान मुलं फोन अजिबातच सोडत नाही, ही अनेक पालकांची तक्रार असते. पण एका महिलेकडे लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवण्याची एक आयडियाची कल्पना आहे. ही तुम्हीही वापरू शकता.
Molly DeFrank व्यवसायाने लेखिका-ब्लॉगर आहे.
Molly DeFrank ने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमधे सांगितले की, स्क्रीन म्हणजेच मोबाइल, टीव्ही या सगळ्यांमुळे ती तिच्या मुलांसोबत वेळ घालवू शकत नव्हती.
Molly ने स्वत: लहान मुलांसोबत जास्त वेळ घालवता यावा यासाठी मोबाइल, टीव्ही बघणं कमी केलं. तिने स्क्रीन टाइमसाठी वेळ निश्चित केली. मुलांचीही टीव्ही बघण्याची एक वेळ ठरवली.
आजच्या जगात पती-पत्नी दोघेही नोकरी करतात. अशात मुलांसाठी वेळ काढणं कठीण असतं. मात्र, Molly ने ठरवलं की, ती तिच्या मुलांसोबत खेळणे सुरू करेल. स्वीमिंग करेल आणि याने फार फरक पडेल. याचा परिणाम असा झाला की, मुलांचं मोबाइल आणि टीव्ही बघणं कमी झालं.
जेव्हा Molly ने लहान मुलांना वेळ देणं सुरू केलं तेव्हा तिच्या सर्वच मुलांमध्ये बराच बदल बघायला मिळाला.
मुलांच्या क्रिएटीव्हिटीमध्येही बरीच सुधारणा झाली आहे.
मुलं पुन्हा पुस्तकांकडे वळली. आता त्यांना कथा वाचणं फार आवडतं.
Molly सुद्धा स्वत: सोशल मीडियापासून दूर राहते. त्यानंतर तिच्या चारही मुलांच्या जीवनात हा बदल झाला आहे.
यातून हे बघायला मिळतं की, आई-वडिलांनी त्यांच्या मुलांना वेळ देणं फार गरजेचं आहे. म्हणजे त्यांना तुम्ही ठरवून, प्लॅनिंग करून वेळ द्याल तर त्यांना मोबाइल, टीव्हीची सवय लागणार नाही.