Hug Day 2021: मिठी मारल्याने केवळ आनंदच मिळतो असं नाही तर आरोग्यालाही होतात फायदे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 11:31 IST2021-02-12T11:25:17+5:302021-02-12T11:31:48+5:30

Hug Day : १२ फेब्रुवारीला हग डे (Hug Day) साजरा केला जातो. ज्या भावना शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करता येत नाहीत त्या प्रेमाने मिठी मारून व्यक्त करता येतात.

Hug Day 2021 : Health benefits of hugging your partner | Hug Day 2021: मिठी मारल्याने केवळ आनंदच मिळतो असं नाही तर आरोग्यालाही होतात फायदे....

Hug Day 2021: मिठी मारल्याने केवळ आनंदच मिळतो असं नाही तर आरोग्यालाही होतात फायदे....

(Image Credit : prabhatkhabar.com)

व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) च्या दोन दिवसआधी म्हणजे १२ फेब्रुवारीला हग डे (Hug Day) साजरा केला जातो. आपल्या पार्टनरला हग करण्यापेक्षा चांगला आनंद आणखी काय असू शकतो. ज्या भावना शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करता येत नाहीत त्या प्रेमाने मिठी मारून व्यक्त करता येतात.

या हग डे (Hug Day) निमित्ताने तुम्ही तुमच्या पालकांना, भावाला, बहिणीला मित्रांना आणि आपल्या पार्टनरला प्रेमाने मिठी नक्की मारा. कारण एखाद्याला मिठी मारून चांगलं वाटत असतं. सोबतच याने आरोग्यालाही अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊ हग करण्याचा काय फायदे आहेत. 

हृदयासाठी फायदेशीर - एका रिसर्चनुसार, हग केल्याने शरीरात लव्ह हार्मोन ऑक्सिटोसिनचं प्रमाण वाढतं. हे हार्मोन्स हृदयासाठी फार फायदेशीर असतात.

ब्लड प्रेशर कमी होतं - वैज्ञानिकांनुसार, हग केल्याने ब्लड प्रेशर कमी होतं. हे शरीरात ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज झाल्याने होत असतं. ५९ लोकांवर करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, जे लोक नेहमी आपल्या पार्टनरला हग करतात, त्याचं ब्लड प्रेशर नेहमीच कंट्रोलमध्ये राहतं.

तणाव कमी होतो - अनेक रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, एखाद्या स्पेशल व्यक्तीला हग केल्याने स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलचं प्रमाण कमी होतं. हग केल्याने तणाव तर कमी होतोच सोबतच व्यक्तीची स्मरणशक्तीही वाढते.

मूड फ्रेश होतो - वैज्ञानिकांचं मत आहे की हग केल्याने व्यक्तीचा मूड चांगला होतो. जेव्हा तुम्ही एखाद्या जवळच्या व्यक्तीला हग करता तेव्हा मेंदूत सेरोटोनिन हार्मोन अधिक प्रमाणात रिलीज होतात. ज्याने तुमचा मूड फ्रेश राहतो. हग केल्याने व्यक्तीची काम करण्याची क्षमता वाढते.

आजारांचा धोका कमी - साधारण ४०० पेक्षा अधिक लोकांवर करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये वैज्ञानिकांना असं आढळून आलं की, हग केल्याने व्यक्तीची आजारी पडण्याची शक्यता कमी होते. ज्या लोकांना पार्टनरचा सपोर्ट मिळतो ते कमी आजारी पडतात. 
 

Web Title: Hug Day 2021 : Health benefits of hugging your partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.