Hug Day: मिठी मारण्याचा डबल फायदा, पार्टनरला खूशही ठेवा आणि निरोगीही ठेवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 10:21 AM2019-02-12T10:21:29+5:302019-02-12T10:21:40+5:30
व्हॅलेंटाइन वीकचा आज सहावा दिवस. आज अनेकजण हग डे म्हणजेच आलिंगन देण्याचा दिवस साजरा करत आहेत.
व्हॅलेंटाइन वीकचा आज सहावा दिवस. आज अनेकजण हग डे म्हणजेच आलिंगन देण्याचा दिवस साजरा करत आहेत. आलिंगन केवळ गर्लफ्रेन्डलाच द्यावं असं काही नसतं. ही आपल्या भावना व्यक्त करण्याची अशी पद्धत आहे, ज्याने आरोग्यालाही अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊ मिठी मारण्याचे फायदे.....
तुम्ही तुमच्या क्रशला किंवा पार्टनरला मिठी मारण्याचा आनंद काय असतो हे काही वेगळं सांगायला नको. पण इतरही तुमच्या जवळच्या व्यक्तींनाही मिठी मारून आनंद मिळतोच. कधी कधी शब्दांची कमतरता असली की, ही मिठी खूपकाही सांगून जाते. भाऊ, बहीण, आई, वडील, मित्र, मैत्रिण, गर्लफ्रेन्ड कुणालाही तुम्ही मिठी मारून तुमच्या भावना व्यक्त करू शकता.
काय होतात फायदे?
1) हृदयासाठी फायदेशीर - एका रिसर्चनुसार, मिठी मारल्याने शरीरातील लव्ह हार्मोन्स ऑक्सीटोसिनचं प्रमाण शरीरात वाढतं. याने रक्तप्रवाह चांगलं होऊन हृदयही निरोगी राहतं. त्यामुळे मिठी मारण्याकडे वाईट दृष्टीकोनातून बघू नये.
२) ब्लड प्रेशर कमी होतं - अभ्यासकांनुसार, मिठी मारल्याने ब्लड प्रेशर सुद्धा कमी होतं. असं शरीरात ऑक्सीटोसिन हार्मोन्स रिलीज झाल्याने होतं. ५९ लोकांवर करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, जे लोक नेहमी पार्टनरला मिठी मारतात, त्याचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं.
३) तणाव कमी होतो - अनेक वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, एखाद्या स्पेशल व्यक्तीला मिठी मारल्याने स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे अर्थातच तणाव कमी होतो आणि व्यक्ती स्मरणशक्तीही वाढते.
४) मूड फ्रेश होतो - अभ्यासक सांगतात की, मिठी मारल्याने व्यक्तीचा मूड फ्रेश राहतो. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मिठी मारता तेव्हा मेंदूमध्ये सेरोटोनिन हार्मोन अधिक प्रमाणा रिलीज होतात. याने तुमचा मूड फ्रेश राहण्यास मदत होते. तसेच मिठी मारल्याने व्यक्तीची काम करण्याची क्षमताही वाढते.
५) आजारांचा धोका कमी - साधारण ४०० लोकांवर करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, मिठी मारल्याने व्यक्तीला वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी असतो. ज्या व्यक्तींना पार्टनरची सोबत मिळते ते कमी आजारी पडतात.
६) जर तुम्हाला एकटेपणा सतावत असेल किंवा मनात कोणती भीती असेल तर आपल्या पार्टनरला एक जादूची झप्पी द्या. असे केल्यानं तुमच्या मनातील भीती आणि एकटेपणा दूर होतो. पार्टनरला झप्पी दिल्यानं आपलेपणाची जाणिव होते. तसेच डोकं शांत होण्यास मदत होते.
७) कोणत्याही नात्यामध्ये छोटी छोटी भांडणं होतातच. पण ही भांडणं वाढवण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला प्रेमानं जवळ घेतलं तर भांडण संपतं.
८) अनेकदा घरातील आणि ऑफिसमधील कामाचा ताण यांमुळे आपल्या माणसांकडे दुर्लक्ष होतं. पण जर तुम्ही तुमच्या पार्टनरला एखादी झप्पी द्याल. तर त्यामुळे तुमच्यातील सर्व रूसवे फुगवे दूर होतील.
९) नात्यामध्ये कधी कधी एक क्षण असाही येतो की, ज्यामध्ये एकमेकांना काही न सांगता एकमेकांच्या मनातल्या गोष्टी समजतात. अशावेळी झप्पी दिल्यानं पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होते. तसेच नर्वसनेस दूर होतो आणि सेल्फ कॉन्फिडंस वाढतो.